Rashtramat

‘सुरक्षितेसाठी सोशल मिडिया का वापरत नाही’

पणजी :
आपण आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मिडियाचा वापर का करत नाही? असा प्रश्न 51 व्या इफ्फी मध्ये सेफचे निर्माते, भारतीय पॅनोरामा चित्रपट विभागात पहिल्यांदा पदार्पण करणारे दिग्दर्शक प्रदीप कालीपुरायथ आणि निर्माते डॉ. के. शाजी यांनी केला. ते आज 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एखादी विपरीत घटना घडण्यापूर्वी ते रोखणे या अगदी सोप्या संकल्पनेला चित्रित करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. हे चित्रित करण्यासाठी आम्ही चित्रपटाची निवड केली. चित्रपट स्त्रीपुरुषसमतावादा पर्यंत मर्यादित न राहता स्त्रीत्वाच्या संकल्पनेवर भाष्य करते. चित्रपटातील पात्र एकमेकांना पूरक आहेत, असे कालीपुरायथ यांनी सांगितले.
‘सेफ’ महिला सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या आणि संबंधित मुद्द्यांवर आणि दैनंदिन जीवनात स्त्रियांना सामोरे जावे लागणार्‍या भीतीवर टाकते. हे मुद्दे अधोरेखित करण्यासोबतच या चित्रपटाने चित्रपट एक पाऊल पुढे टाकत तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या समस्यांचे काय समाधान असू शकते हे देखील दाखविले आहे.
चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना प्रदीप म्हणाले: संकल्पना स्वतः निर्मात्याने लिहिली आहे. त्यांना तीन मुली आहेत आणि आपण त्यांना कशाप्रकारे सुरक्षित ठेऊ शकतो याकडे ते नेहमीच लक्ष देतात. त्यांनी या कल्पनेसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे जेणेकरून यावर काही उपाय मिळू शकेल आणि अशा लोकांपर्यंत ती प्रभावीपणे पोहचू शकेल. यासाठी आम्ही माध्यम म्हणून आम्ही चित्रपटाची निवड केली.
pradeep kalipurayath safe
आजकाल सोशल मीडिया आपल्या आयुष्यातील बर्याच गोष्टी ठरवते. तांत्रिकदृष्ट्या आपण आपल्या मोबाइल फोनमध्ये एक समांतर विश्व निर्माण केले आहे आणि म्हणूनच आपल्या सुरक्षिततेसाठी देखील त्याचा सक्षम वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
चित्रपटाविषयी निर्माते डॉ. के. शाजी म्हणाले, आपण दररोज सकाळी उठल्या उठल्या महिलांवरील अत्याचाराच्या गोष्टी वाचतो. अनेक यंत्रणा कार्यरत असूनही महिला सुरक्षित नाहित. चित्रपटात हाच विचार विस्तृत पद्धतीने मांडला आहे. सेफ ही एक कल्पना आहे जी कोठेही लागू केली जाऊ शकते.

हे वाचलंत का?

‘नेत्रदानाबद्दल राज्यात जागृती करणार’

Rashtramat

आज उघडणार इफ्फीचा पडदा…

Rashtramat

‘राम मंदिर अनंत काळ मानवाला प्रेरणा देईल’

Rashtramat

Leave a Comment