Rashtramat

विनायक खेडेकर यांना पद्मश्री सन्मान 

PADMA AWARD

नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गोमंतकीय लोकसाहित्याचे अभ्यासक आणि संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गोवा कला अकादमीचे 23 वर्षे अविरत सदस्य सचिव राहिलेले विनायक खेडेकर आपल्या संशोधक वृत्तीसाठी गोव्यामध्ये ख्यातनाम आहेत. गोमंतकीय जनमानसाची नेमकी नस गवसलेल्या विनायक खेडेकरांनी लोकवेदाचे संकलन, संपादन करून गोव्याचे लोकसााहित्य जगासमोर आणले. गोवा संस्कृतीबंध, गोवा लग्नआख्यान, इको-कल्चरल गोवा परदीग्रम, लोकसरिता: गोमंतकी जनजीवनाचा समग्र अभ्यास आदी पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी गोमंतकीय लोकसाहित्याचा पट मांडला. साधी-सरळ आणि सोपी शब्दकळा असलेल्या विनायक खेडेेकर यांनी विविध दैनिकांमध्ये लोकसााहित्यावर स्तंभदेखील सातत्याने लिहिले आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे गोव्यामध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वस्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
padma awards
पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहो यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. आज एकूण 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

#corona: माजी सैनिकांची वाहतूक सेवा

Rashtramat

वारी (कविता)

Rashtramat

‘गोव्यात समूह संसर्ग झालेला नाही’

Rashtramat

Leave a Comment