Rashtramat

‘वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज’

library

आजरा :
“वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज असून त्या करिता मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची गरज आहे”. असे मत साहित्यिक बाबुराव शिरसाट यांनी व्यक्त केले. ते झुलपेवाडी ता. आजरा येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी व शिवारबा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अध्यक्ष पदावरून बोलत होते. प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष तानाजी पावले यांनी केले. शिरसाट पुढे म्हणाले,”खेड्यांनी मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवले पण, आर्थिक परिस्थिती चांगली झाली, माणूस शहरात गेला आणि मराठी भाषेची हेंडसाळ झाली.
डॉ. संभाजी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात लेखक नंदू साळोखे यांची दमसाचे कार्यवाह आणि प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर कवी गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी डी.एच.पाटील, सागर मिसाळ, संजय केसरकर, नंदू साळोखे, अशोक गुरव, संजय खोचारे, संतोष पाटील सविता चव्हाण, राम सुर्वे, सचिन दुधाळे, किरण देशपांडे आदींचे संमेलन पार पडले. सुत्रसंचालन रामकृष्ण मगदूम व दत्तात्रय सुतार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शि.गो. पाटील, राजन कोनवडेकर, बालसाहित्यिक प्रकाश केसरकर व सरपंच नामदेव जाधव, गणपतराव चव्हाण यांच्यासह चिकोत्रा खोऱ्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. सचिन दुधाळे यांनी आभार मानले.

हे वाचलंत का?

विरूष्काच्या घरी ‘धनाची पेटी’

Rashtramat

‘लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ’

Rashtramat

वारी (कविता)

Rashtramat

Leave a Comment