मुंबई :
‘गोदरेज इंटिरिओ’च्यावतीने (godrej interio) रुग्णांसाठी वापरावयाच्या खास ‘प्लॅटफॉर्म बेड’ची निर्मिती केली आहे. गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी ‘गोदरेज अँड बॉइस’ या कंपनीने याबाबतची घोषणा केली. ‘अॅक्युरा’ या नावाची ही नवीन श्रेणी हॉस्पिटल बेड्ससाठीची एक अनोखी संकल्पना आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मॅन्युअल स्वरुपातील ‘अॅक्युरा बेड’चे रुपांतर ‘मोटराईज्ड’ स्वरुपात करू शकतात. शहरी आणि ग्रामीण भारतातील रुग्णालयांमध्ये कार्यक्षम, योग्य पायाभूत सुविधांची गरज आहे, हे लक्षात घेऊन ‘गोदरेज इंटरिओ’ (godrej interio) ब्रॅंडने ही नवीन श्रेणी सादर केली आहे.
भारताची आरोग्यसेवेची व्यवस्था परिवर्तनाच्या मार्गावर आहे, असे दिसते. त्यात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, तसेच त्यामध्ये काही गंभीर उणीवादेखील आहेत. भारतीय आरोग्यसेवेमध्ये आव्हानात्मक ठरणाऱ्या काही मुद्द्यांमध्ये, पायाभूत सुविधांचा अभाव आणि निधीची कमतरता यांचा समावेश होतो. या समस्यांचे निराकरण म्हणून ‘अॅक्युरा हॉस्पिटल बेड्स’ सादर करण्यात आले आहेत. स्पेसिफिकेशन्सप्रमाणे बेड तयार करता येणे आणि परवडणारे दर ही याची वैशिष्ट्ये आहेत.
नवीन उत्पादनाच्या सादरीकरणाप्रसंगी ‘गोदरेज इंटरिओ’चे (godrej interio) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथुर म्हणाले, “सर्वजणांचे जीवनमान दररोज समृद्ध करण्याचे ‘गोदरेज इंटरिओ’चे ध्येय आहे. भारतीय आरोग्यसेवेची व्याप्ती, त्यातील सेवा आणि खासगी कंपन्या व सामान्यजनांकडून या क्षेत्रात होणारा खर्च या सर्व बाबी मोठ्या वेगाने वाढत आहेत; तथापि, खर्चाची गणिते सांभाळताना रुग्णांना सुखसोयी व सुरक्षा पुरविणे याकडे लक्ष देण्याचे वातावरण आपल्याकडे नाही. आरोग्यसेवा क्षेत्रासमोर असणारी अनन्य आव्हाने लक्षात घेऊन अनेक नवकल्पनांवर आम्ही ‘गोदरेज इंटिरिओ’मध्ये (godrej interio) काम करत आहोत.
‘गोदरेज इंटरिओ’चे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट समीर जोशी म्हणाले, “भारतात आरोग्यसेवा ही महसूल आणि रोजगाराच्या बाबतीत सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक बनली आहे, दरवर्षी 16 ते 17 टक्क्यांची वाढ या क्षेत्रामध्ये होत आहे. तथापि अनेकदा, भारतातील आरोग्य सुविधा बदलत्या गरजांशी विसंगत असतात. रूग्ण व त्याच्या कुटुंबियांना उपचाराच्या दरम्यान सहाय्यभूत ठरणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर ‘गोदरेज इंटिरिओ’चा आरोग्यसेवा व्यवसाय भर देतो. या अर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या, उपचारांना अनुकूल असलेल्या सुविधांमध्ये रुग्ण, काळजीवाहक आणि डॉक्टरांसह सर्व भागधारकांची कार्यक्षमता, सहानुभूती आणि कल्याण यावर भर देण्यात येतो. हॉस्पिटलच्या बेड्सची नवीन सुरू केलेली अॅक्युरा श्रेणी ही आमच्या डिझाइन तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकते. ही श्रेणी मानवी-केंद्रित दृष्टिकोन अवलंबण्यावर आणि रूग्ण-डॉक्टरांच्या सुधारित परस्परसंवादासाठी जागेचा योग्य तो उपयोग करण्यावर आधारित आहे.”
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments