Rashtramat

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन

gazal

पुणे :
आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.
ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेत असत. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. 2020च्या जुलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्याने त्यांना जबर मार लागला होता. शिवाय वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशही जडला होता. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी लिहिलेल्या 13 दोह्यांच्या ‘दोहे इलाहीचे’ या संकलनात्मक पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं होतं.

हे वाचलंत का?

‘कोंकणी नियतकालिकां’वर उद्या ‘वेबिनार’

Rashtramat

रा.स्व.सं.चे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांचे निधन

Rashtramat

‘कोरोनाबाबत सरकारचे वरातीमागून घोडे’

Rashtramat

Leave a Comment