Rashtramat

रिहाना, ग्रेटा आणि मियाचाही शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा

farmers protest

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.
नवीन कृषी कायदे रद्द करा, असं म्हणत दोन महिन्यांपूर्वी पंजाब, हरयाणासह देशातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांना दिल्लीला धडक दिली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं. तेव्हापासून सिंधू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसाचाराच्या आरोपानंतर शेतकरी आंदोलन आणखी पेटलं असून, आता त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटू लागले आहेत.
इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानापाठोपाठ तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे.
रिहानानंही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे.
farmers protest
पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा
दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पॉर्नस्टार मिया खलिफानेही पाठिंबा दिला आहे. मिया खलिफाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टि्वट केलं आहे. तिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करत, दिल्लीतील घटनाक्रमाने धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
“मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. त्यांनी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडीत केली” असे तिने टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. तिने आंदोलनाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात एका माणसाच्या हातात शेतकऱ्यांची हत्या थांबवा असा फलक आहे.

हे वाचलंत का?

अंधश्रद्धेचा बळी ठरलेला ‘पिटर’

Rashtramat

‘परिक्रमा’च्या अध्यक्षपदी फिरोझ शेख

Rashtramat

वरवरा राव यांची प्रकृती खालावली

Rashtramat

Leave a Comment