Rashtramat

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

rajiv kapoor

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना चेंबूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
“मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
rajiv kapoor
राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलं होतं.

हे वाचलंत का?

माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन 

Rashtramat

‘पहिल्या सिनेमाचा आनंद वेगळाच…’

Rashtramat

‘स्काय फाऊंडेशन’ वाढवतेय पोलिसांचे मनोबल

Rashtramat

Leave a Comment