मुंबई :
फ्युचर जनराली (future Generali) इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय)च्या वतीने हेल्थ सुपर सेव्हर लॉन्चची घोषणा करण्यात आली. हे एक अभिनव विमा उत्पादन असून त्याच्या प्रीमियमवर सूट देण्यात येणार आहे. या प्लानच्या पहिल्या/ दुसऱ्या वर्षात पॉलिसीधारकाकडून कोणताही दावा करण्यात आला नसेल, तर पुढील वर्षांकरिता आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम रकमेवर ही पॉलिसी 80% सूट देऊ करेल.
एफजीआयआयकडून दोन प्रकारची उत्पादने म्हणजे 1X आणि 2X उपलब्ध असणार आहेत. हेल्थ सुपर सेव्हर 1X प्लानमध्ये, जर पॉलिसीधारकाने पहिल्या वर्षात कोणताही दावा केला नसल्यास पुढील कालावधीत लागू प्रीमियमवर 80% सूट मिळणार आहे. तर हेल्थ सुपर सेव्हर 2X प्लानमध्ये, जर जर पॉलिसीधारकाने दोन वर्षांकरिता कोणताही दावा केला नसेल किंवा केवळ एकच दावा करण्यात आला असल्यास त्याला आगामी काळात सलग दोन वर्षे लागू प्रीमियमवर 80% सूट मिळेल. त्याशिवाय, वैयक्तिक राशी विमा आधारावर दोन किंवा अधिक कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्यास अतिरिक्त 10% चे फमिली डिस्काउंट उपलब्ध होईल. हे उत्पादन एक दिवसाचे नवजात शिशू ते 70 वर्षे वयाच्या वरिष्ठ नागरिकांकरिता उत्पादन कवच उपलब्ध करून देते.
अनुप राऊ हे फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ असून ते म्हणाले की, “हे अभिनव उत्पादन आहे. पहिल्या वर्षात कोणताही दावा केला नसल्यास ग्राहकाला दुसऱ्या वर्षात 80% पर्यंची सूट मिळणार आहे. त्यात कोणतेही छुप्या बाबी, जर-तर समाविष्ट नाही. युवकांना आरोग्य विमाचे महत्त्व पटवून देण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. या वयातील ग्राहक हेल्थ प्रीमियम भरण्याच्या बाबतीत उदासीन असतात, दावा न केल्यास पैशांचे “नुकसान” होते असा समज त्यांच्यात रूढ असतो. मानसिक आजार तसेच मानसशास्त्रीय हस्तक्षेप अथवा सल्ल्याकरिता हे उत्पादन सर्वांकष कवच देखील देते.”
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments