Rashtramat

‘गोदरेज’ नेणार शेवटच्या माणसापर्यंत कोरोना लस

Godrej

मुंबई :
‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या बिझिनेस युनिटच्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तपमानात सुरक्षितपणे साठविल्या जाव्यात, याकरीता प्रगत, देशातच बनविलेली ‘मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स’ या कंपनीकडून पुरविली जात आहेत. आज या कंपनीने अत्याधुनिक, अल्ट्रा-लो (अतिशय कमी) तपमानाचे फ्रीझर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आणि लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अति महत्त्वाच्या लसी उणे 80 अंश सेल्सियस या तापमानात ठेवता येतात. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही वैद्यकीय शीतसाखळीला चालना देण्याच्या उद्देशाने हे फ्रीझर बनविण्यात आले आहेत.
भारतात देण्यात येत असलेल्या व तपमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशील्ड’ या लसी साठवण्यासाठी, ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झालेल्या राष्ट्रीय निविदेचा एक भाग म्हणून, 2 ते 8 अंश सेल्सिअस तपमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून बनविले जात आहेत. ‘डायल्युंट्स’साठी उणे 20 अंश सेल्सियसचे तपमान राखणारे वैद्यकीय फ्रीझर्स आणि कोविड लसीकरण मोहिमेत अखेरच्या टप्प्यापर्यंत लसी नेण्यासाठी लागणारे ‘आईस पॅक’ हेदेखील कंपनीतर्फे तैनात करण्यात येत आहेत. विशिष्ट टप्प्यापलीकडे तपमानात चढ-उतार झाल्यास या लसींचे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व आर्थिक नुकसानही होते.
अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मुळे कंपनीच्या ‘पोर्टफोलिओ’मध्ये एक नवीन भर पडली आहे. विशेषत: सध्या इतर काही देशांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या एमआरएनए-आधारित लसींसाठी हे फ्रीझर अनुकूल आहेत. ‘एमआरएनए-आधारित कोविड-19 लसी’ या तपमानाबाबत अति-संवेदनशील असतात आणि त्या अत्यंत थंड तपमानातच साठवाव्या लागतात. वातावरणातील इतर रेणूंमुळे नष्ट होण्याचा सततचा धोका ‘एमआरएनए’ला असतो. लस उत्पादकांनी ‘सिंथेटिक एमआरएनए’मध्ये रासायनिक बदल करून ते संरक्षक थरामध्ये गुंडाळले असले, तरी लसींचा अपव्यय रोखण्यासाठी त्या उणे 80 अंश सेल्सियसपेक्षा कमी तपमानात साठवणे आवश्यक असते; अन्यथा त्याचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच, शीतगृह साखळीशी संबंधित लॉजिस्टिकल मुद्द्यांमुळे लसीकरण प्रक्रियेत कोणतीही नासाडी किंवा अकार्यक्षमता टाळली जाणे आवश्यक आहे.
‘मेडिकल कॉम्पोनंट्स’, ‘हॉस्पिटल बेड अॅक्च्युएटर्स’, ‘व्हेंटिलेटर्स’साठीचे ‘इलेक्ट्रो-मॅग्नेटिक व्हॉल्व्ह’ यांसारखी उपकरणे असोत; लोकांना घरात सुरक्षितपणे राहता यावे यासाठी ‘डिसइन्फेक्टंट’ उपकरणे बनविणे असो; किंवा लोकांना सुरक्षितपणे काम करता येण्यासाठी सामाजिक अंतर राखता येण्याजोगी कार्यालये उभी करणे असो; ‘गोदरेज’ने नेहमीच देशाचा विचार प्राधान्याने केला आहे. ‘मेड इन इंडिया’ मेडिकल रेफ्रिजरेटर्स, फ्रीझर्स व आता अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर्स बनवून, देशालाच नव्हे तर जगाला सर्वात जास्त गरज असलेल्या वेळी, सेवा करता येत असल्याचा कंपनीला अभिमान आहे.
Godrej
या प्रसंगी ‘गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड’चे​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद गोदरेज म्हणाले, “कोविड-19च्या लसीकरण मोहिमेची व्याप्ती आणि तिला मिळणारे सहकार्य, या गोष्टी या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यात महत्त्वाच्या ठरणार आहेत. आज, कोविड लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे चालविण्यात जगभरातील अनेक देशांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शीतकरण साखळीतील अपुरी उपकरणे ही एक मुख्य समस्या आहे. त्यामुळे लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते, आणि मानवी आरोग्यास त्याची किंमत मोजावी लागू शकते. रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानामधील गोदरेजचे अनेक दशकांचे कौशल्य लक्षात घेता, आमच्या ब्रॅंडतर्फे लसी व जीवरक्षक औषधांची साठवणूक करण्याकरीता प्रगत शीतगृहांची एक श्रेणीच उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातून जगभरातील अनेक देशांना कोविड-19विरुद्धच्या लढ्यात मोलाची मदत होऊ शकेल. लसींसाठीच्या शीतगृह साखळीसारख्या पायाभूत सुविधांचा विचार केला असता, भविष्यात सज्ज राहण्याची गरज या कोविडच्या साथीने अधोरेखित केली आहे. एक समूह म्हणून आम्ही सतत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी परिवर्तन करीत आहोत, तसेच देश स्वावलंबी होण्यासाठी सहयोग देत आहोत. ‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’च्या आमच्या नवीन सादरीकरणामुळे, भारताला भविष्यातील लसींसाठी अधिक सज्ज राहण्यास मदत मिळेल. या आमच्या प्रयत्नांमुळे ‘मेड इन इंडिया’चे तत्व जगापुढे यशस्वी करून दाखविण्याचे आमचे धोरण यशस्वी ठरते आहे.”

हे वाचलंत का?

ऐश्वर्या आणि आराध्याला देखील कोरोना

Rashtramat

अनलॉक 3 : काय सुरु, काय बंद?

Rashtramat

‘व्हिसलिंग वूड्स’च्या ऑनलाईन परीक्षा ‘या’ दिवशी  

Rashtramat

Leave a Comment