Rashtramat

‘ओकस्मिथ’ आता मिळणार गोव्यातही

oaksmith

पणजी : 
सनटोरीचे प्रमुख ब्लेंडेर शिंजी फुकुयो यांनी बनवलेली  ओकस्मिथ ही प्रीमियम भारतीय व्हिस्की आहे. फुकुयो यांनी याआधी हिबिकि आणि यामाझाकी सारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्हिस्की बनवल्या आहेत. चांगल्या दर्जाचे स्कॉच माल्ट, स्मूथ अमेरिकन बरबन्सचे मिश्रण आणि जापनीज पद्धतीने करण्यात येणाऱ्या ब्लेंडिंगमुळे ओकस्मिथ बनली आहे. असून ओकस्मिथ​ आता गोव्यातही मिळणार आहे. 
कंपनीने भारतातुन २०३० पर्यंत १ दशलक्ष अमेरिकन डॉलर महसूल गोळा करण्यासाठी धोरण आखले असून हे लॉंचिंग त्यातीलच एक भाग आहे.डिसेंबर २०१९ मध्ये ओकस्मिथचे महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे यशस्वी पदार्पण झाले होते . तर मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विस्तार वाढवला होता. गोव्यात ही व्हिस्की ओकस्मिथ गोल्ड आणि ओकस्मिथ इंटरनॅशनल या दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतात लाँच झाल्यावर अगदी काही महिन्यातच या ब्रँडच्या १,००,००० उत्पादनाची विक्री झाली आहे.
याविषयी माहिती देताना बिम सनटोरी,भारताचे व्यवस्थापकीय संचालक नीरज कुमार म्हणाले की “डिसेंबर २०१९ मध्ये लॉन्च केल्यानंतर ग्राहकांनी ओकस्मिथला भरघोस प्रतिसाद दिला हे पाहून आम्ही उत्साहित झालो आहोत.भारतातील मद्यप्रेमींमध्ये ओकस्मिथची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

हे वाचलंत का?

…अखेर ‘पबजी’चा खेळ खल्लास

Rashtramat

१०, १२वी बोर्डाचे महत्व केले कमी

Rashtramat

चला, राजकारणी बनूया!

Rashtramat

Leave a Comment