मुंबई :
कॅनरा बँकेतर्फे गाला ऑडिटोरियम, पटुक कॅम्पस सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे मेगा रिटेल एक्स्पो कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. एक्स्पोमध्ये मुंबई आणि आसपासचे आघाडीचे बिल्डर्स आणि विकासक, महत्त्वपूर्ण ऑटोमोबाईल वितर, आघाडीच्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर बँकेकडून दक्षिण मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर व ठाणे येथील सेलिब्रेशन बँक्वेट हॉल येथेही एक्स्पोचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते.
या एक्स्पोला उपस्थित मान्यवरांमध्ये जनरल मॅनेजर, रीटैल ऐसेट आणि मार्केटिंग- हेड ऑफिस- बंगलोर आर पी जयस्वाल, चीफ जनरल मॅनेजर – मुंबई सर्कल पी. संतोष, रिजनल ऑफिस १ चे डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज कुमार दास, डेप्युटी जनरल मॅनेजर रिजनल ऑफिस २, प्रवीण काबरा आणि ठाणे रिजनल ऑफिस च्या डेप्युटी जनरल मॅनेजर के बी गीता व अन्य मान्यवरांचा समावेश होता. या एक्स्पो मध्ये सर्व मान्यवरांनी ग्राहकांशी संवाद साधला आणि एक्स्पो मधील सर्व स्टॉल्सना भेट दिली. एक्स्पो मध्ये उपस्थित असलेल्या रिटेलर्स नी त्यांच्या स्टॉलवर त्यांची विविध उत्पादने प्रदर्शित केली होती. आज आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पो मध्ये रू. 224.30 कोटी च्या कर्जांचे वाटप करण्यात आले.
या एक्स्पो बरोबरच कॅनरा बँकेने नानावटी हॉस्पिटलच्या सहकार्याने एक्स्पो ला भेट देणार्या लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणीचेही आयोजन केले होते. या एक्स्पोच्या दरम्यान बँकेकडून कोविड-१९ साठी आवश्यक सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले, यामध्ये प्रवेश करतांना थर्मल स्कॅनिंग करणे, मास्क आणि सॅनिटायझेशन स्टेशन्स, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच थोड्या लोकांना प्रवेश देणे इत्यादींचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
- Comments
- Facebook comments