गोवा 

‘…तर ‘त्या’ रुग्णालयांवर करणार कारवाई’

पणजी :
खासगी रुग्णालये कोविड रुग्णांना प्रवेश नाकारतात अशा परिस्थितीत आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना संचालक आरोग्य सेवा (directorhealth_goa@yahoo.co.in ) किंवा सेक्रेटरी हेल्थ (secyga.goa@gov.in ) यांना ईमेल करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे यांनी आश्वासन दिले.

”सरकार गोव्यातील सर्व खासगी रुग्णालयांना केवळ सौम्य आणि मध्यम रुग्णांच्या रूग्णांनाच दाखल न करता गंभीर रूग्णनाही दाखल करण्याची सूचना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नाही त्यांच्या हितासाठी अशा तक्रारी प्राप्त करण्यासाठी विभागाकडून ‘हेल्पलाइन क्रमांक’ जाहीर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. ”ते म्हणाले.

गोवा सरकारने रुग्णांच्या प्रवेश प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी राज्यातील २१ खासगी रुग्णालयांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे जेणेकरुन कोविड रुग्णांना 50% खाटाचे वाटप करता येतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: