गोवा 

मुख्यमंत्र्यांनी केले प्रत्येकाला लस घेण्याचे आवाहन

डिचोली :
कोविड महामारीतून  गोवा राज्याला सहीसलामत बाहेर येता यावे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यामातून  सर्वप्रयत्न सुरू आहेत  टीका उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत क्षेत्रातील पालिका विभागातील व्यक्तीने लस घ्यावी हा आपला आग्रह असून त्यासाठी पंच सरपंच नगरसेवक आमदार मंत्री व सामाजीक सस्थानी जागृती करून लोकांना लसीकरण करून घेण्यास आग्रही असावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी डिचोलीत केले.  या वेळी सभापती राजेश पाटणेकर आमदार प्रवीण झाट्ये नगराध्यक्ष  कुंदन फळारी अभिजित तेली  व इतर मान्यवर उपस्थित होते
झांटये सभागृहात सुरू असलेल्या कोविड टीका उत्सवात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थिती लावून लस घेणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला व प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी असे आवाहन केले. डॉ सावंत यांनी लोकांची विचारपूस केली व त्यांच्याकडून कोविड व इतर बाबतीत माहिती घेतली व गावागावातील लोकांना घरच्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा व शंभर टक्के मोहीम यशस्वी करा असे  आवाहन केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: