कला-साहित्य

‘कोविड काळातील अध्ययन: माझे अनुभव’ कथन स्पर्धेचे आयोजन

मडगाव :
येथील पलाश अग्नी स्टुडियोसच्या वतीने नित्यानंद क्रियेशन्स आणि थिंक अँड इंक ह्या समुहांच्या सहयोगाने प्राथमीक तसेच माध्यमीक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी प्रा. नित्यानंद नायक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘कोविड काळातील अध्ययन: माझे अनुभव’ या विषयावर कोंकणी भाषेतून अनुभव कथन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे नियम व अटी आहेत. कोविड काळात ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आलेले अनुभव त्यानी स्वत:च्या शब्दांत कमीत कमी तीन मिनीटे आणि जास्तीत जास्त पाच मिनटांत व्हिडीयोच्या माध्यमांतून मांडावे लागतील. व्हिडीयो बसून किंवा उभा राहून तसेच घरात किंवा बाहेर कुठेही मोकळ्या जागेत रेकॉर्ड करायला मुभा आहे, पण आवाज स्पष्ट आणि ऐकण्याजोगा असावा.  रेकोर्डींग करताना मोबाइल आडवा ठेवणे गरजेचे आहे. स्पर्धेचे परिक्षण अनुभवातली विविधता, कथन शैली, सहज प्रकटीकरण, समरसता आणि सादरीकरण या मुद्द्यांवर होइल. व्हिडीयो 7 जून 2021 पर्यंत pafilms18@gmail.com ह्या इ-मेल आयडीवर पाठवून द्यावा. व्हिडीयो बरोबर स्पर्धकांनी आपले नाव, 2020-21 वर्षातली इयत्ता, शाळेचे नाव आणि फोन नंबर कळवावा. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला इ-प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धा पहिली ते चवथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी (2020 -21 शैक्षणिक वर्षात) या तीन गटात असणार आहे.  निकाल 14 जून रोजी प्रा. नित्यानंद नायक यांच्या जयंती दिनी जाहीर करण्यात येईल. स्पर्धेतले व्हिडीयो Palash Agni Studiosच्या फेसबूक पेज तसेच युट्यूब चॅनेलवर  अपलोड करण्यात येतील.

अधिक माहिती साठी पलाश अग्नी 7350426399 किंवा अनीश अग्नी 9405951996 यांना संपर्क साधावा असे आवाहन पलाश अग्नी स्टुडियोसच्या वतीने युगा घोडगे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: