सातारा 

‘रणजितसिंह देशमुख यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी’

कराड (अभयकुमार देशमुख) :
कोरोना युद्धात सैनिक म्हणून काम करताना आशा स्वयंसेविका सुरेखा गुरव यांचे निधन झाल्याने  त्यांचे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.  त्यातून सावरण्यासाठी हरणाई उद्योग समूहाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात पुढे करत रणजितसिंह देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

खातवळ (ता.खटाव ) येथील आशा सवयंसेविका सुरेखा गुरव यांच्या कुटुंबियांना हातभार म्हणून पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, अजित पाटील चिखलीकर, अशोकराव गोडसे, डॉ.महेश गुरव ,डॉ.विवेक देशमुख, भरत जाधव ,सत्यवान कांबळे ,शंकर फडतरे ,देवानंद फडतरे, सरपंच प्रतिनिधी सुनील फडतरे, चेअरमन नवनाथ फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बाबा म्हणाले की,सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर मात करन्यासाठी  प्रशासन अहोरात्र काम करत आहे.खटाव तालुक्यात ही कोरोनांने डोके वर काढले असून  मायणीत नुकतेच तीस बेड चे कोविड सेंटर सुरू केले आहे.जिह्यात लवकरच शंभर ते सव्वाशे ऑक्सिजन  बेड उपलब्ध करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर तज्ञ संशोधकांचा अभ्यास सुरू आहे.मात्र कोरणावर मात करण्यासाठी  सामाजिक अंतर, मास्क चा वापर व वारंवार हात धुणे या तीन गोष्टींचे जनतेने तंतोतंत पालन करणे गरजेचे असल्याचे ही बाबानी सांगितले.

आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना ५०लाख विम्याची तरतूद असली तरी आशा स्वयंसेविकेंचा  त्यामध्ये समावेश नसल्याचे नमूद करत त्यांना ही शासकीय मदत मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. फील्ड वर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेना विमा कवच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून लवकरच शासनस्तरावर त्याचीअंमलबाजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बाबांनी सांगितले

यावेळी रमेश फडतरे,अंकुश फडतरे,प्रमोदसिंह फडतरे,सुखदेव फडतरे, सतीश फडतरे, शिवाजी मोहिते, जीवन बागल, प्रदीप फडतरे, साधू फडतरे,धनाजी मोहिते,नवनाथ कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सत्यवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर देवानंद फडतरे यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: