गोवा देश-विदेश

‘मोदींमुळेंच जगात भारताला महत्वाचे स्थान’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

पणजी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हातात घेऊन गेल्या सात वर्षात असामान्य नेतृत्व,कर्तृत्व,व वक्तृत्व  या माध्यमातून भारताची मान आणि शान उंचावलेलि असून जागतिक महाससत्तेकडे वाटचाल सुरू आहे हे करीत असताना देश पातळीवर क्रांतिकारक कायदे बदल सामाजिक व्यवस्था नेटकी करून प्रत्येक घरात समृद्धी व मानवी जीवन समृद्ध परिपूर्ण करण्यासाठी अनेक योजनांना चालना दिल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मोदींजींच्या नेतृत्वाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सेवा ही संघटन कार्यक्रमातून मतदारसंघात धान्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भामाई येथे आयोजित कार्यक्रमास  दीप्राज प्रभू,प्रदीप गावंडे,संतोष नाईक,दिनू नाईक व इतर उपस्थित होते.

कोविडमुळे काही प्रमाणात विकास प्रक्रियेत अडथळा असला तरी प्रगती कुठेच रखडलेली नाही मानवी मुल्ये जपताना जनतेच्या अपेक्षांची कदर करीत मोदींजींच्या  सर्वंकष विकासाला मोठी चालना दिली आहे त्यामुळे आज प्रत्येक घटकापर्यंत योजना पोचत आहेत  गोवा आदर्श राज्याच्या दिशेने वाटचाल करीत असून कोविडमुळे अनेक समस्या संकटे आली, तरीही त्याचा खंबीर मुकाबला करण्यासाठी केंद्राने खूप मदत केली.  अनेक संस्थाही पुढे आल्या कोविड योद्धे ठिकठिकाणी जीव धोक्यात घालून जनसेवा करीत आहेत त्या सर्वांना माझा सलाम असेही या वेळी मुख्यमंत्री डॉ  सावंत यांनी सांगितले. यावेळी दिपराज प्रभू यांनी स्वागत केले  या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. संपूर्ण मतदारसंघातील सर्व बूथवर विविध कार्यक्रम झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: