गोवा 

साळमध्ये टीका उत्सवाला मोठा प्रतिसाद

डिचोली :
तालुक्यातील साळ  ग्रामपंचायत क्षेत्रात टिका उत्सवाच्या लसीकरणाच्या पहिल्या टीका लसीकरण याची दुसरी फेरी येथे उत्साहात पार पडली .त्याला नागरिकांनी  उदंड प्रतिसाद दिला .पंचेचाळीस वर्षावरील एकंदर १४३ नागरिकांनी लस टोचून घेतली .यात साळ,  खोलपेवाडी , साळ पुनर्वसन , कुमयामळा ,कोळगीरे आदी क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थिती दाखवली. हा टिका उत्सव सरकारी प्राथमिक शाळा – साळ येथे झाला.
यावेळी गोवा राज्याचे सभापती व डिचोली मतदारसंघाचे आमदार राजेश पाटणेकर , गोवा राज्य भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी शिल्पा नाईक, साळचे माजी सरपंच व पंच प्रकाश राऊत,  माजी सरपंच व पंच वासुदेव परब, उपसरपंच वर्षा साळकर, तमर नाईक महिला मंडळ – खोलपे च्या अध्यक्षा व भाजपा कार्यकर्ता सपना शिरोडकर,  भाजप कार्यकर्ते मोहन राऊत गोपी राऊत तसेच  डॉक्टर स्नेहा हळदणकर, परिचारिका योजना गावस ,स्मिता ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की टिका उत्सव हा केंद्र सरकारच्या मदतीने गोवा सरकार घडवून आणीत आहे .कोरोना महामारी मुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले आहेत असून मानवी जीवन व आरोग्य सांभाळणे प्रत्येकाच्या हाती आहे. आरोग्य खात्याचे नियमावलीचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी शिल्पा नाईक म्हणाल्या की टीका उत्सवाच्या पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीला उत्तम प्रतिसाद लाभला .टिका उत्सव गावागावात घडवून आणल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला. वयोवृद्धाना डिचोली मध्ये जाण्यासाठी कठीण होत होते. गावागावात या योजना राबविल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आला त्यामुळे सरकारचे आभार मानावे तेवढे थोडेच . आज कोरोना महा मारीत नागरिक भयभीत असून त्यांनी न भिता लस टोचून घेणे हा एकमेव उपाय आहे.

सामाजिक आरोग्य केंद्र – डिचोली व उपआरोग्य केंद्र साळ यांच्या सहकार्याने घडवून आणलेला टीका उत्सव हा डॉक्टर स्नेहा हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .यात परिचारिका योजना गावस,  सुलोचनी चंद्रोजी, शिवाजी  म्हाळकर, आरती झरमेकर ,अनिता गावस, परशुराम माळगावकर ,विभा गोवेकर ,अमृत ताटे, सुमित्रा माजीक,   अश्विनी मोरजकर , लवू गावस , साळ उप आरोग्य केंद्रातील परिचारिका प्रतिभा दूर्भाटकर व स्मिता ठाकूर यांनी लस घेण्यास आलेल्या नागरिकांना चांगली सेवा देऊन मदत केली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: