सातारा 

‘कापील’च्या शाळेत आता विलगीकरण कक्ष 

कराड (अभयकुमार देशमुख) :
तालुक्यातील  कापील ग्रामपंचायतीच्यावतीने जवाहर विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयात 20 बेडचा सर्व सोयी सुविधेसह विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून गावातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कापील ग्रामपंचायतीने 20 बेड़चा कक्ष सुरु केला असून यामध्ये ऑक्सीजन मशीन,वाफारा मशीन,पीपीई किट,सेनेटायझर, गरम पाण्याची सुविधा, रुग्नांच्या वापरासाठी स्वछतागृहे,शुद्ध पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधेसह ,प्राथमिक ​​आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या विलगिकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच सौ.कल्पना गायकवाड़ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच धोंडीराम मोरे,ग्रामपंचायत सदस्य नितिन ढापरे,पराग जाधव,ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार,तलाठी राजेंद्र खुडे,भरत पाटील, नंदकुमार जाधव,तानाजी गायकवाड़,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागात होम आयसोलेशन सल्ला दिलेल्या रुग्णांना त्यांच्या घरात स्वतंत्र बाथरूमसह विविध अडचणी असतात,घरी सुविधेचा अभाव असल्याने घरातील इतर व्यक्ति किंवा शेजाऱ्यांना संक्रमणाचा धोका वाढतो.या समस्येवर मात करण्यासाठी कापील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुसज्ज विलगिकरण कक्ष सुरु केला आहे.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: