सातारा 

‘कृष्णा’ निवडणूक छाननीत 22 अर्ज अवैध

कराड (अभयकुमार देशमुख) :
य.मो.कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत 22 अर्ज अवैध ठरले आहेत.
यामध्ये वडगाव हवेली दुशेरे गटातून 3 जागांसाठी 42 उमेदवारानी 9 दुबार अर्जासह 51 अर्ज दाखल केले होते.त्यातील 36 वैध तर 6 अवैध ठरले आहेत. काले कार्वे गटातून 3 जागांसाठी 33 उमेदवारानी 10 दुबार अर्जासह 43 अर्ज दाखल केले होते.त्यातील 27 वैध तर 6 अवैध ठरले आहेत.

नेर्ले तांबवे गटातून 3 जागांसाठी 26 उमेदवारानी 7 दुबार अर्जासह 33 अर्ज दाखल केले होते.त्यातील 25 वैध तर 1 अवैध ठरला आहे. रेठरे हरणाक्ष बोरगांव गटातून 3 जागांसाठी 32 उमेदवारानी 18 दुबार अर्जासह 50 अर्ज दाखल केले होते.त्यातील 29 वैध तर 3 अवैध ठरले आहेत.

येडे मच्छिंद्र वांगी गटातून 2 जागांसाठी 18 उमेदवारानी 6 दुबार अर्जासह 24 अर्ज दाखल केले होते.त्यातील 14 वैध तर 4 अवैध ठरले आहेत. रेठरे बु.शेणोली गटातून 2 जागांसाठी 21 उमेदवारानी 9 दुबार अर्जासह 30 अर्ज दाखल केले होते.त्यातील 19 वैध तर 2 अवैध ठरले आहेत.

महिला राखीव गटातून 2 जागांसाठी 25 उमेदवारानी 8 दुबार अर्जासह 33 अर्ज दाखल केले होते.त्यातील 25 वैध तर 0 अवैध ठरले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून एका जागेसाठी 15 उमेदवारानी 2 दुबार अर्जासह 17 अर्ज दाखल केले होते.त्यातील 15 वैध तर 0 अवैध ठरले आहेत.

इतर मागासवर्ग गटातून एका जागेसाठी 12 उमेदवारानी 0 दुबार अर्जासह 12 अर्ज दाखल केले होते.त्यातील 12 वैध तर 0 अवैध ठरले आहेत. वि.जा.भ.ज. राखीव गटातून एका जागेसाठी 11 उमेदवारानी 1 दुबार अर्जासह 12 अर्ज दाखल केले होते.त्यातील 11 वैध तर 0 अवैध ठरले आहे

कारखाना निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 70 दुबार अर्जासह 235 उमेदवारानी 305 अर्ज दाखल केले होते.त्यातील 213 अर्ज वैध तर 22 अर्ज अवैध ठरले आहेत.

माघार घेण्याची मुदत उद्या दि.3 ते 17 जून पर्यंत असून या कालावधीत किती अर्ज मागे घेतले जातील यावरून निवडणूक रिंगनात नेमके किती आणि कोणते उमेदवार हे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: