गोवा 

‘शापोरा’तील ‘त्या’ जेटीविरोधात एकवटले स्थानिक

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर ) :
शापोरा नदीच्या पात्रात शिवोलीच्या बाजूने  होवू घातलेल्या तरंगत्या जेटीला  मार्णां- शिवोली पंचायतीचा विरोध झाल्यानंतर ही जेटी आता चोपडे फेरी धक्क्यावर स्थलांतरित करीत असल्याचे आश्वासन मरीन टेक इंडिया या कंत्राटदार कंपनीचे बिसनेस डेवोलोपमेंट ऑफिसर कॉस्मा डिसोजा यांनी दिले आहे.  ही तरंगती जेटी एमपीटीची तर नाही ना असा संशयही व्यक्त केला जात असल्याने जेटी द्वारे कोळसा वाहतूक तर होणार नाही ना असा  प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत,
दोनचार दिवसात या तरंगत्या जेटीची जोडणी पूर्ण झाल्यानंतर ही जेटी आता चोपडे फेर्री धक्क्याच्या बाजूला हलवण्यात येणार आहे.त्यामुळे आता चोपडे पंचायतीने या जेटीला विरोध करण्याच्या दृस्ठीने पावले उचलली आहेत. गुरुवारी होणार्या खास बैठकीत तसा ठराव मंजूर करून कॅप्टन ऑफ पोर्ट ला सादर करण्यात येणार असल्याचे स्थानिक पंच भगीरथ गावकर यांनी सांगितले .शिवोली प्रमाणेच आगरवाडा –चोपडे पंचायतीतील नागरिकांचा या जेटीला तीव्र विरोध आहे त्यामुळे लोकांचा जर विरोध असेल तर पंचायतीचाही त्याला विरोध असल्याचे गावकर म्हणाले याबाबत आपण आगरवाडा –चोपडेच्या सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर ,उपसरपंच सौ.समिता राऊत तसेच अन्य सदस्यांना कल्पना दिली असून गुरुवारी होणार्या विशेष बैठकीत या तरंगत्या जेटी विरुद्ध ठराव मंजूर करून नदी परिवहन खात्याला पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले .
 जेटी बाबत स्थानिकात संभ्रम
गेल्या  पंधरवड्यात शापोरा नदीच्या पात्रात शिवोली –चोपडे पुलाखाली गुडेच्या बाजूने अचानक जेटीची सामुग्री आणून टाकण्यात आली.त्यानंतर या तरंगत्या जेटीचे प्रत्यक्ष काम सुरु झाले .त्यानंतर संभ्रमित झालेल्या मार्न –शिवोली पंचायतीतील नागरिकांनी पंचायतीकडे संपर्क साधला.पंचायतीने याची दखल घेवून नियोजित जेटीच्या जागी काही स्थानिक नागरिकासह भेट देवून कंत्राटदार कंपनीला जाब विचारला .यावेळी मार्नां शिवोली पंचायतीच्या सरपंच सौ.शर्मिला वेर्णेकर ,स्थानिक पंच फ्रेडी फर्नांडीस ,विघ्नेश चोडणकर ,माजी पंच मुन्नी आगर्वाडेकर ,स्वामी समर्थ संघटनेचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर तसेच काही स्थानिक नागरिक  उपस्थित होते .
या जेटीला मार्नां-शिवोली पंचायतीचा विरोध : सरपंच शर्मिला वेर्णेकर 
शिवोलीतील नागरिकांचा या जेटीला विरोध असल्याने पंचायतीचा सुद्धा याला विरोध राहील.शापोरा नदी तीरावरील बंधाऱ्याची पूर्णपणे पडझड झाली असताना प्राधान्य क्रमाने सरकारने या बंधार्याचे काम हाती घेवून शिवोली गावाचे संरक्षण करणे आवश्यक असताना लोकांना नको असलेला हा प्रकल्प का लादावा ? असा प्रश्न उपस्थित करून त्या म्हणाल्या  स्थानिकांना हानिकारक असलेली मुरगाव पोर्ट ट्रस्टची जेटी आम्ही कोणत्याही परस्थितीत उभारू देणार नसल्याचे सांगून ही जेटी त्वरित हटवावी असे सांगितले.
जेटीबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे अन्यथा गाव एक करू : निलेश वेर्णेकर
या जेटी बाबत सरकारने प्रथम स्पश्ठीकरण करावे लोकात याविषयी संभ्रम आहे शापोरा नदी ही इथल्या पारंपारिक मच्छीमार बांधवांची जीवनदायिनी आहे.या नदीतील मासे ,खुबे ,तिसरे ,कालवा ,शिनाने यावर स्थानिकांची उपजीविका चालते या ठिकाणी जेटी झाल्यास स्थानिकांच्या हक्कावर गदा येणार आहे त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे त्यासाठी याबाबत स्पष्टीकरण करावे अशी मागणी  केली .सरकारचा जर हा प्रकल्प असता तर सरकारी प्रतिनिधी असते हा प्रकल्प खासगी असल्याचा नागरिकांना संशय असल्याचे सांगून या बाबत संभ्रम दूर करण्याची मागणी केली.
या जेटीचे चोपडे येथे लवकरच स्थलांतर : कॉस्मा डिसोजा
जेटी उभारण्याचे कंत्राट मिळालेल्या मरीन टेक इंडिया कंपनीचे व्यवसाय विकास अधिकारी कॉस्मा डिसोजा म्हणाले हा  केंद्र सरकारच्या निधीतून  राज्यसरकार ही जेटी उभारीत असून त्याचा सामाजिक जेटी म्हणून करण्यात येणार आहे त्याचा लाभ स्थानिक नागरीका बरोबर मच्छीमार बांधवाना होणार आहे शिवोच्या बाजूने ही जेटी ठेवण्यात येणार नसून चोपडे येथील फेरीधाक्क्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येणार आहे आता फक्त ही जेटी या ठिकाणी जोडण्यात येईल नंतर ती हलवण्यात येईल याविषयी कंत्राटदार कंपनीने मार्नां पंचायतीला पत्रही दिले असल्याचे सांगितले सध्या लॉक डाऊन चे दिवस असल्याने कामगारांची उणीव आहे त्यामुळे थोडा विलंब लागला तसेच काम करण्यासाठी भरती ओहोटी बघून काम करावे लागते त्यामुळे शिवोली वासियांनी थोडी कळ सोसावी दोन चार दिवसात निश्चितच ही जेटी चोपडेच्या फेरी धक्क्याजवळ स्थलांतरित करण्यात येतील अश्या एकून पाच जेटी उभारण्यात येणार आहेत पैकी गोवा राज्याच्या घटक राज्य दिनी रायबंदर येथील जेटीचा शुभारंभ केला तर कॅप्टन ऑफ पोर्टस तर्फे मांडवी नदीच्या पात्रात पणजी येथे एक जेटी उभारली आहे आणखी पणजी येथे जेटी उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान शिवोली येथे जोडण्यात येणारी ही जेटी चोपडेच्या बाजूने हलवण्यात येणार असल्याने चोपडेतील नागरिकत भीती निर्माण झाली आहे. चोपडे येथे दोन फेर्री धक्के आहेत त्यातील नेमक्या कुठल्या धक्क्याजवळ ही जेटी उभारण्यात येणार आहे हे स्पष्ठ नाही. ही जेटी मार्मुगोवा पोर्ट ट्रस्टची असल्याची चाहूल लागल्याने या  ठिकाणी कोळशाची वाहतूक होणार तर नाही ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही युवकांनी आमदार दयानंद सोपटे यांची भेट घेवून या जेटीला आमचा विरोध असल्याचे सांगितले असल्याचे समजते त्यामुळे आमदार सोपटे याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: