गोवा 

‘विरोधकांनी अगोदर काम करावे, मग बोलावे’

उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिले आव्हान

​पेडणे  (निवृत्ती शिरोडकर) :

कोरोना महामारीच्या काळात या मतदारसंघात बाबू आजगावकर नाही . कोठे आहे ?असा प्रचार झाला. गरजूवंत, कोविड झालेले रुग्ण व कुटुंबे यांना जीवनावश्यक वस्तू, मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांना धान्य, शेतकऱ्यांना पेरणीसाठी धान्य व खत, भात कापणीसाठी यंत्र असे उपक्रम राबविले. कुणीतरी येऊन उगाच माझ्यावर टिका करतात. विरोधकांनी अगोदर काम करावे आणि मग बोलावे​, असे आव्हान उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिले. सेवा​ ​ही संघटन कार्यक्रमांतर्गत वजरी येथे पेडणे भाजपतर्फे निजतुकीकरण फवारे मारण्यात आले असता याप्रसंगी बोलत होते.

​नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याने सेवाही संघटन कार्यक्रमांतर्गत वजरी येथे पेडणे भाजपतर्फे निजतुकीकरण फवारे मारण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री आजगावकर बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सोमा खडपे, सरपंच करुणा कृष्णा नाईक, सुरेश परब, सुदाम परब, प्रथमेश परब , स्मिता कळंगुटकर पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस हे उपस्थित होते.​
 
​काही लोक चार माणसाना धान्य देऊन प्रसिद्ध मिळ​वतात.  आम्ही काही वाट​प केला तर ते मतदार संघातील सर्वांना दिली आहे. यांना या मतदारसंघात कोणीही ओळख नाही .पेडणे मतदारसंघात आम्ही अनेक मोठे प्रकल्प आणले आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध होतील. वजरी गांवात दोन पूल, दोन वाड्याना एकत्र जोडणारा स्वप्नवत रस्ता व इतर अनेक रस्ते ​केल्याचे त्यांनी सांगितले. ​

“कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेला आमच्या सरकारने गोवा ग्रीन झोनमध्ये ठेवले. पण कोरोनाची दुसरी लाट ही महाभयंकर होती. गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ह्या महामारीने हाहाकार उडविला त्यात आमच्या कित्येक लोकांना मृत्यूही आला. या अनुभवातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सक्षम आ​हे. ​

पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश
योग्य दिशेने प्रगतीच्या दिशेने झेप घेतलेली आहे. गोव्यातही भाजपच्याच राजवटीत मोठी प्रगती झालेली आहे. तर पेडणे मतदारसंघात उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्यामुळे चौफेर विकास झालेला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्यक्ष लोकांमध्ये न येता उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी महामारीवेळी कार्यकर्त्यातर्फे लोकांसाठी सर्व कामे केली.  तर ते सरळ लोकांमध्ये आले​​ असते. हेच विरोधकांनी आजगावकर यांनी पेडणेत कोरोना आणून सोडला असा प्रचार केला अस​ता, असे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: