गोवा 

मोरजीतील सांडपाणी गटारांचे तीन तेरा

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​)​ :

सरकार दरवषी राज्यात रस्त्याशेजारी गटारावर करोडो रुपये खर्च करून ते पैसे पाण्यात घालत असतात , करोडो पैसे खर्च करूनही गावागावातील वाड्या वाड्यावरील गटारांचे तीन तेरा वाजत आहे , कुणीच याकडे लक्ष  देत नसल्याने अधून मधून पडत असलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते , पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकानाही त्याचा बराच त्रास होतो , याकडे सार्वजनिक बंधका​म​ रस्ता विभाग आणि पंचायतीने लक्ष घालून उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे .

मोरजी पंचायत क्षेत्रातील न्यू वाडा मोरजी येथील मुख्य रस्त्यावरील गटार व्यवस्था कोलमडल्याने नुकताच पाऊस पडून गेला ते पाणी आजही रस्त्यावर जश्यास तसे आहे .रस्ता करताना सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाने गटार व्यवस्था केली नसल्याने पावसाचे रस्त्यावरील पाणी जाणार कुठे , आणि गटारे आहेत ती दगड धोंड्यांनी भरलेली आहे . सरकारच्या सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग आणि मोरजी पंचायतीने यावर तातडीने उपाय योजना करून पाण्याचा निचरा करावा .

मोरजी पंचायत क्षेत्रात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकामे उभी आहेत व चालू आहेत , या बांधकामाना कुणाचा विरोध नाही ,. मात्र बांधकामे करताना पाण्याचा निचरा कसा  होईल या वर कुणीच लक्ष देत नाहीत . त्यामुळे रस्त्याच्या बाजूची गटार व्यवस्था कोलमडून जात आहे .

रस्त्यावर  बांधकाम साहित्य :
रस्त्यावरच गावचा आणि वाड्यावरील विकास अवलबुन असतो , रस्ता असेल कि विकासाला गती येते , रस्त्याच्या बाजूला मग ती शेत जमीन सुपीक असो किंवा नापिक , मातीचा भराव टाकून बांधकामे केली जातात , दुकान घरासाठी आरक्षित सुरक्षीत्त पार्किंग व्यवस्था नसतानाही बांधकामे करून सार्वजनिक रस्ते अडवण्याचा प्रकार गावागावात घडत असतो . बांधकाम करतान बांधकाम साहित्य , बांधकाम पूर्ण झाले तरीही तसेच पडून असते , रस्त्यावरील महिना दोन महिने बांधकाम साहित्य तसेच पडून असेल तर त्यावर सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाने कारवाई करण्यासाठी त्याना अधिकार असतात मात्र रस्ता विभागाने आजपर्यत अशी कोणतीच कारवाई केली नाही , त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावर अतिक्रमण होत असतानाचे चित्र दिसते .

आश्वे दोन तीन ठिकाणी पाणी रस्त्यावर :
मांद्रे पंचायत क्षेत्रातील  आश्वे किनारी भागातीलही गटार व्यवस्था कोलमडल्याने एकूण तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी साचून राहिलेले आहे . यावर पंचायतीने लक्ष घालून त्यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे .

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: