गोवा 

”​आना फोंत’च्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा’

मडगाव :
​​आना​ ​फोंत उद्यान हे मडगाव शहराचे भुषण आहे. या जागेवर एक बहुमजली इमारत बांधण्याचा डाव काहीजणांनी आखला होता. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या पाठिंब्याने सदर प्रस्ताव रद्द करण्यात मी यशस्वी झालो व हे उद्यान तयार झाले. सरकारने आनाफोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

मडगा​​वच्या आमदारांनी आज वन खात्याचे उप वन संरक्षक पि. लि. एटे,  सहाय्यक वन संरक्षक ज्ञानेश्वर कुडाळकर, आरएफओ युसेबियो ब्रागांझा, वन रक्षक संदिप गावडे तसेच स्थानीक नगरसेवक सगुण नायक, आनाफोंत उद्यान देखभाल समितीचे निमंत्रक ॲड. माधव बांदोडकर, समाजसेवक सिद्धांत काणेकर यांच्या समवेत आनाफोंत उद्यानाला भेट देवुन पाहणी केली.

आनाफोंत उद्यानाचे वैभव परत मिळवुन देण्यासाठी वन खात्याने ताबडतोब पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे मी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले आहे. येथिल झरीचे पाणी साचुन राहिल्याने दुषीत झाले आहे. ते प्राधान्यक्रमाने स्वच्छ करणे गरजेचे आहे. झाडे व गवत कापणे, व्यासपिठ दुरूस्त करणे तसेच कपडे बदलण्यासाठीच्या खोल्यांची दुरूस्ती करणे, संगीत कारंज्यांची दुरूस्ती करुन ते पुर्नकार्यांवित करणे अशी कामे हाती घेणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

गोव्यातील पहिला संगीत कारंजा हा आनाफोंत उद्यानात बसविण्यात आला होता. या उद्यानाला भेट देणारे लोक व खास करुन लहान मुलें यांना या उद्यानाच्या जागेच्या एकंदर रचनेमुळे सुरक्षितता लाभते. ॲड. माधव बांदोडकर व इतर या उद्यानाचे व्यवस्थापन सांभाळत होते. परंतु, २०१२ नंतर सत्तेत आलेल्या सरकारने त्यांना  सहकार्य देण्याचे थांबविल्याने आज आनाफोंत उद्यानाची दुर्दशा झाली असल्याची खंत दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

आनाफोंत उद्यानासारखे प्रकल्प लोक व लहांन मुलांना विरंगुळा देतात. सरकारने अशा प्रकल्पांच्या देखभालीत राजकारण आणू नये. सरकारला सुबुद्धी येईल व या उद्यानाला लवकरच पुर्नवैभव प्राप्त होईल अशी आशा मी बाळगतो असे दिगंबर कामत म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: