गोवा देश-विदेश

‘एसडीजी इंडेक्स’मध्ये केरळ अव्वल, गोवा चौथ्या स्थानी 

नवी दिल्ली :
नीती आयोगाने आज सतत विकास लक्ष्यासाठी (एसडीजी) इंडिया इंडेक्स 2020-21 निर्देशांक जाहीर केला. एसडीजीच्या अहवालानुसार केरळने भारतातील राज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे, म्हणजे ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर बिहारने सर्वात वाईट कामगिरी केली आहे. या यादीमध्ये गोवा चौथ्या क्रमांकावर आहे.

एसडीजी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचं मूल्यांकन करतं. 75 गुणांसह केरळने अव्वल राज्य म्हणून आपलं स्थान कायम राखलं. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू दोघांनीही 74 च्या गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. तर तर 72 गुणांसह गोव्याने चौथं स्थान पटकावलं आहे. यंदाच्या भारत निर्देशांकात बिहार, झारखंड आणि आसाम सर्वांत वाईट कामगिरी करणारी राज्य ठरलीत.

एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या हस्ते गुरुवारी भारताच्या एसडीजी निर्देशांकाची तिसरी आवृत्ती लाँच करण्यात आली. कुमार म्हणाले की एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून एसडीजींवर नजर ठेवण्याचे आमचे प्रयत्न जगभरात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातायत आणि त्यांचं कौतुक होतंय. एसडीजीवर एकत्रित निर्देशांक मोजून आमची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना क्रमवारी लावण्यासाठी हा एक दुर्मिळ डेटा-चालित उपक्रम आहे. हे प्रथम डिसेंबर 2018 मध्ये लाँच केलं गेलं. देशातील एसडीजीवरील प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागतिक लक्ष्यांवर स्थान मिळवून स्पर्धा वाढविण्यासाठी निर्देशांक हे मुख्य साधन बनले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: