सातारा 

‘राज्याच्या राजकारणात देणार रणजितसिंहना ताकद’

कराड (अभयकुमार देशमुख) :
माण-खटावमध्ये भरीव निधीची तरतूद करणार असून रणजितसिंह देशमुख यांच्या रूपाने एक निस्वार्थी नेतृत्व मिळाले आहे,त्यांच्या माध्यमातून विकासाची पताका फडकणार असून राज्याच्या राजकारणात रणजितसिंह देशमुखांना ताकद देणार असल्याचे मत पशुसंवर्धन व क्रीडा,युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले.

हरणाई सूतगिरणीला दिलेल्या सपत्नीक सदिच्छाभेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव,अशोक गोडसे,डॉ महेश गुरव,मृणाल पाटील,शिवाजी यादव,बाबासाहेब माने,रमेश भोसले,सयाजी सुर्वे,अजित घाडगे,टिल्लू बागवान,प्रमोद राऊत,राजेंद्र पवार,निलेश घार्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी बोलताना केदार म्हणाले की,सहकारी संस्था कागदावर उभ्या करणे सोपे असते,मात्र प्रत्यक्षात चालविण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात.रणजितसिंह देशमुख यांनी सर्वसामान्य दुष्काळी भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा या हेतूने मोठ्या कष्टाने औद्योगिक क्रांती केली.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की माण-खटाव मधील अनेक शेळी-मेंढी पालक कोरोनामुळे अडचणीत आहेत,त्यांना मदत करण्याची मागणी केली तसेच माण-खटाव मध्ये तालुक्यात अनेक क्रांती झाल्या,आपल्या माध्यमातून शेळी मेंढीच्या बाबतीत क्रांती होण्यासाठी येथील शेतकऱ्यांना भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी देशमुख यांनी केली.विविध मागण्यांचे निवेदन यावेळी ना.केदार यांना रणजितसिंह देशमुख यांनी दिले.डॉ महेश गुरव यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद राऊत यांनी आभार मानले.

कार्यकर्त्यांनी जोर लावा :

रणजितसिंह देशमुख यांच्या रूपाने माण-खटाव तालुक्यात काँग्रेसचा विकासरुपी झेंडा फडकेल यात काही शंका नाही,तुम्ही वाटेल तेवढा निधी मागा मी द्यायला तयार आहे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रणजितसिंह देशमुख यांचे नाव येण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोर लावा असे आवाहन केदार यांनी केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: