सातारा 

‘कृष्णे’च्या २१ जागांसाठी ३०५ अर्ज दाखल

कराड (अभयकुमार देशमुख) :
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 78 अर्ज दाखल झाले असून  21 जागांसाठी एकूण 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर बुधवार 2 जूनला सकाळी 11 वाजता अर्ज छाननी केली जाणार आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2021- 25 यासाठी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आज, 1 जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. सदर मुदतीत दाखल झालेल्या एकूण  305  नामनिर्देशन अर्जांची छाननी दिनांक 2 जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  यांनी लागू केलेल्या निर्बंधानुसार गर्दी होणार नाही. याची दक्षता घेऊन सदरची छाननी गटनिहाय व मतदार संघ निहाय करण्यात येणार आहे. प्रथम अनुक्रमे गट क्र.1 ते 6  गटात दाखल नामनिर्देशन पत्रांची छानणी गट निहाय होईल व त्यानंतर अनुक्रमे  महिला राखीव, अ.जा.अ.ज.,इमाव व वि.जा.भ.ज.वि.मा. प्रवर्गातील नामनिर्देशन पत्रांची छानणी करण्यात येईल. त्यामुळे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की प्रत्येक गटातील केवळ उमेदवार किंवा सूचक अथवा त्यांचे वकील यांनीच उपस्थित राहावे

प्रत्यक्ष छाननी वेळी त्या गटातील फक्त  उमेदवार किंवा सूचक अथवा त्यांच्या वकिलांनाच प्रवेश देण्यात येईल ही बाब विचारात घेता छाननीच्या वेळी बाजार समिती आवारामध्ये अनावश्यक गर्दी करू नये. तसेच गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित उमेदवार, सूचक व वकील यांनी फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडून करण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: