गोवा 

हळर्णच्या सरपंचपदी उर्मिला उल्हास परब बिनविरोध

​पेडणे :

हळर्ण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला उल्हास परब यांची शुक्रवारी घेण्यात आलेल्या सरपंच निवड निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. सरपंच आंतोनियो राॕड्रिग्स यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद रिक्त होते.

​सरपंच निवडीवेळी उपसरपंच विशाल नाईक यांनी  ऊर्मिला परब यांचे नाव सरपंचपदासाठी सूचविले. तर त्याला अनुमोदन  पंच नारायण राऊळ  यांनी दिले.

यावेळी उपसरपंच विशाल नाईक,  पंच नारायण राऊळ,  आंतोनियो राॕड्रिग्स, शमा हरिजन,  दिव्या नाईक व उर्मिला परब हे सहा सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून कृष्णा गडेकर यांनी काम पाहिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: