गोवा 

राज्यात लॉकडाऊन १४ पर्यंत वाढला

पणजी :
राज्यात सुरु असलेली संचारबंदी १४ जून पर्यंत वाढवण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज घोषणा केली.  त्यासोबत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना शिथिलता देत, या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संचारबंदी वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील संचारबंदी सात दिवसांनी वाढवला असून आता १४ जून पर्यंत राज्यात संचारबंदी लागू असणार आहे. १४ जून रोजी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, संचारबंदी वाढवण्यासोबतच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकानांही दिलासा दिलाय. अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडी ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. आता सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानं खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा मालाची दुकानं आणि अन्य ज्या दुकानांना खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली होती, त्यांना आता आणखी अतिरीक्त दोन तास दुकानं उघडी ठेवता येणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: