गोवा 

शिक्षक विठोबा बगळी व पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार

​​पेडणे ​(​प्रतिनिधी​)​ :

​​तालुक्यातील उच्चमाध्यमिक विध्यालईनपातळीवर राज्य शिक्षक पुरस्कार पाप्त झालेले प्रा. विठोबा बगळी आणि पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा नुकताच शिवोली येथील शिवोली महिला अर्बन बहुउदेषीय सोसाईटीतर्फे फ्रंट लाईन कर्मचारी म्हणून कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

शिवोली येथील कीर्ती विध्यालयाच्या सभागृहात सोसाईटीच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला मंत्री गोविंद गावडे , खास निमंत्रित चित्रकार संजय हरमलकर , शिवोली वूमन सोसाईटीच्या चेरमेन पल्लवी दाभोलकर , बाल कल्याण खात्याच्या दिपाली नाईक , कायतानो फर्नांडीस , शिवंम प्रभू , आसगाव सरपंच हनुमंत नाईक , ओशेल सरपंच वंदना नार्वेकर, सडये सरपंच निलेश व्हायगणकर , मार्रना सरपंच शर्मिला वेर्णेकर , स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर आदी उपस्थित होते.

विठोबा बगळी आणि पत्रकार  निवृत्ती शिरोडकर यांचा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देवून जाहीर सत्कार केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: