गोवा 

‘शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन राज्यकारभार व्हावा’

पेडणे :
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. सर्व धर्म समाजाला एकत्रित घेवून स्वराज्य स्थापन केले . प्रजेला न्याय दिला. देशासमोर एक आदर्श घालून दिला , राजा कसा असावा हे शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले , हिंदवी स्वराज स्थापन करून प्रजेचे रक्षण केले . हाच आदर्श घेवून आम्हाला प्रजेसाठी काम करावे लागेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे या नात्याने ते कोरगाव येथे  बोलत होते .

यावेळी कोरगाव सरपंच स्वाती गवंडी , हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर , पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर , पेडणे मामलेदार अनंत मळीक , प्रा. सुदन बर्वे , पंच उदय पालयेकर , माजी सरपंच तथा पंच सदस्या प्रमिला देसाई , माजी सरपंच उल्हास देसाई , पंच उमा साळगावकर भाजपा पेडणे मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , पंच नानू पालयेकर , उपसरपंच समीर भाटलेकर ,कुस्तान कुयेलो , आबा उर्फ नारायण तळकटकर व नागरिक उपस्थित होते .

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना जसे शिवाजी महाराज यांनी सर्व जनतेला सोबत घेवून राज्य केले त्याच पद्धतीने आता राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हेही जनतेला सोबत घेवून राज्य करत आहेत , शिवाजी महाराजा यांचा आदर्श घेवून ते राज्यकारभार करतात असा दावा केला .

राज्याचे डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री असताना कोरोना महामारीचे संकट आले , एवढे वाईत संकट असतानाही मुख्यमंत्री डगमगले नाही , दुसरा कुणी मुख्यमंत्री असतात तर अर्ध्यावर डाव सोडून पळाला असता . हाच सावंत खरा गोमंतकीय रयतेचा राजा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला .

पेडणे मतदारसंघात जे नवीन प्रकल्प होवू घातले आहेत.  त्या प्रकल्पातुंनच पेडणेकराना  रोजगार नोकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत  , त्या संधीच आम्ही सर्व मिळून सोने करुया, सरकारी नोकऱ्या सर्वांनाच मिळणार नाही , मात्र खाजगी कंपनीतून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील, आणि त्या नोकऱ्या पेडणेकरानाचं मिळवून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली.

आपल्या मतदारसंघातील सर्व सरपंच पंच ,मंडळी , जिल्हा सदस्य कार्यकर्ते चांगले मिळाले आहेत  , त्याच बळावर आम्हाला मतदार संघ आदर्श मतदारसंघ बनवायचा आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची परत एकदा आम्हाला साथ हवी , मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा रयतेच्या राज्याला सत्ता देऊया असे आवाहन करून जर आपले काही चुकले तर जनतेने आपल्याला मोठ्या मनाने माफ करावे , आपल्याला तुमच्यापासून दूर करू नका , आपण मंत्री असलो , आमदार असलो तरी जनतेची नोकरी करण्यासाठी  नोकर आहे जनतेची सेवा करण्यासाठी सेवक आहे हे व्यक्तव्य करायला   उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आजच्या  दिनी विसरले  नाही .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: