गोवा 

‘ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लब’च्या युवतींने केले वृक्षारोपण

पेडणे (प्रतिनिधी) :
​पार्से येथील ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लब तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनमहोत्सव क्लबचे चेअरमन दीपक कलंगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा करण्यात आला .

या वनमहोत्सवाचे विशीष्ट म्हणजे मोरजी , मांद्रे , पार्से , तुये , हरमल , पेडणे , वारखंड व कोरगाव , या भागातील विषया कांबळी . दिशा कांबळी , तृप्ती परब , उलीन्दा फर्नांडीस , सेफली राऊळ , गृपाली साटेलकर , श्रुती शेटगावकर , प्रतीक्षा गावडे , रसिका नानोस्कर , पूजा वेंगुर्लेकर , रश्मी शेट्ये , रीमा आसोलकर , काशी सावळ देसाई , शामली सावंत , अर्पिता सावंत , श्रद्धा आरोंदेकर , सायीशा शेटगावकर , अमिषा शेटगावकर , निकिता तुळसकर . नेहा मालवणकर , मिलन सावळ देसाई , सलोनी राऊळ सितारा मांद्रेकर या युवतींनी सहभाग दर्शवून ठीकठिकाणी वृक्षारोपण केले .

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ,झाडे लावा जीवन जगवा हा संदेश सनातन काळापासून चालू आहे ,झाडे जगली तरच मनुष्य प्राणी , जीव जंतू या धर्तीवर आनंदाने जगू शकेल , सर्वत्र विकासाच्या नावावर वृक्षांची कत्तल करून कोन्क्रीटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे , त्यामुळे शुद्ध हवा मोकळी हवा घेताना श्वास रोखला जावू शकतो ,प्रदूषणामुळे सजीव सजीव वृस्ठी धोक्यात आली आहे , झाडे नाही तर प्राणवायू मिळणार नाही ,त्यामुळे मोठी झाडे लावा प्राणवायू मिळावा हा संदेश महत्वाचा ठरत आहे .

मनुष्य जीवन व त्यासाठी लागणाऱ्या सुखसोयी , रोजगाराची साधने यासाठी ठीक ठिकाणी झाडे कापून मोठ मोठे प्रकल्प आणावे लागत आहे ,आणि या प्रकल्पाला अडथळा ठरणारी हजारो मोठी झाडे कापावी लागतात , ती कापल्यानंतर साधन सुविधा निर्माण होते , झाडे लावली तर आपल्याला प्राणवायू मिळेल , पाऊस हवा असल्यास झाडे लावा .झाडे केवळ मनुष्याच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी महत्वाची नसून जशे मनुष्याला या झाडा फळापासून फायदा होईल त्याच पद्धतीने पशु पक्षी जनावरे यानाही लाभ होत असतो .

पार्से येथील किडा क्षेत्रात अग्रेसर असलेला ध्रुव स्पोर्ट्स क्लब , यांनी यंदा पर्यावरणाचे जतन आणि हरित क्रांती घडवण्याच्या धृस्ठीने २०१८ ध्रुव वन महोत्सव साजरा करण्याचे झाहीर करून पूर्ण पेडणे तालुक्यात तीही फळाची व फुलांची झाडे लावण्याचा संकल्प करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयज्ञ केलेला आहे ,आणि त्याचा शुभारंभ आज करण्यात आला असे चेअरमन दीपक कलगुटकर म्हणाले​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: