गोवा 

गावकरवाडा नाल्यावर उभारणार संरक्षक भिंत

डिचोली (प्रतिनिधी) :
गावकारवाडा  चिमुलवाडा मये येथील नाल्यातील गाळ उसपणे व संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रवीण झाट्ये यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी भाजप मंडळ अध्यक्ष दया कारबोटकर सरपंच सीमा आरोदेकर  कृष्णा परब ,विश्वास चोडणकर ,तुळशीदास चोडणकर, उर्वी मसुरकर आदी उपस्थित होते.

प्रत्येक पंचायत विभागात  विकासकामाना चालना देताना सर्वच विभागातील कामांना  प्राधान्य देत  जलद गतीने विकास साधला जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक घरात पोचवण्यात येत आहेत. विकासाच्या प्रक्रियेत सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रवीण  झाट्ये यांनी केले. या वेळी सरपंच सीमा आरोदेकर यांनी मये पंचायत  विभागातील  विकासाला आमदार सहकार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: