गोवा 

‘या’ तारखेपासून होणार राज्यात संचारबंदी शिथिल

पणजी :
राज्यात सुरु असलेली संपूर्ण संचारबंदी १४ जून रोजी संपणार आहे. सध्या आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार १४ नंतर संचारबंदी वाढवणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा यावर अप्रत्यक्षरीत्या शिक्कामोर्तब केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी, राज्यात १५ जून नंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, संचारबंदी शिथिल केल्यानंतरही येत्या दोन महिन्यात भरपूर काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे 30 जून पर्यंत कोरोना लसीचा पहिला डोसचं 100 टक्के लसीकरण करण्याचं ध्येस सरकारचं अशल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतरही पर्यटन आणि राज्यातील इतर गोष्टी सुरु करण्याबाबत विचार केला जाऊ शकेल, असं डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
कोरोना लसीकरणासोबतच येत्या काळात खबरदारी बाळगणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. त्यासोबतच गोव्यातील कोरोना रुग्णवाढ आता नियंत्रणात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे गोव्याचा रिकव्हरी रेट वाढला असून रुग्णवाढीचं प्रमाण घटलंय. सक्रिय रुग्णांची संख्याही घटतेय. लोकसंख्या कमी असल्यामुळे राज्यातील लसीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं, यालाच सध्याच्याघडीला प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना दिली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: