गोवा 

माजी जिल्हा पंचायत सदस्य सुर्यकांत तोरस्कर यांचा सन्मान

पेडणे (प्रतिनिधी)
तोरसे येथील पंच , उपसरपंच , सरपंच ते जिल्हा पंचायत सदस्य बनलेले सुर्यकांत तोरस्कर यांचा त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांच्या हितचिंतकानी गौरव आयोजित केला होता . पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी बँक अधिकारी कृष्णा देसाई , हवामान खात्याचे संदीप मोरजकर प्रज्वल धारगळकर ,नंदा तोरस्कर ,गजानन तोरस्कर आदी उपस्थित होते.

विद्यमान पंचायत सदस्य माजी सरपंच, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुर्यकांत गोविंद तोरस्कर  यांनी  तोर्से हायस्कुलच्या विस्तारित इमारती पासून आपल्या सरपंचपदाच्या कार्यकीदीची दमदार सुरवात करीत ते आत्तापर्यंत तोरसे पंचायतीवर प्रतीनिधीत्व करीत आहेत. ते ज्या ज्या निवडणुकीला राहीले ते कधी पराजीत झालेच नाहीत. तोरसे पंचायतीवर सर्वात जास्त काळ सरपंचपद त्यानी भुषवले. गोवा सरकारच्या विविध महामंडळावर त्यानी प्रतीनिधीत्व केले आहे  केन्द्र सरकारने त्याच्या सरपंचपदाच्या काळात केलेल्या  उत्कुष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांची तिलारी प्राधीकरणावरही सदस्य म्हणुन निवड केली होती  पत्रादेवी आउट पोष्टची इमारत, तोर्से हायस्कुलमधे एनसीसी त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अस्तीत्वात आले.

गोव्यातील पहिल्या जिल्हा पंचायतीवर तोरसे मतदार संघातुन ते निवडुन आले होते.  त्यांच्या काळात तोरसे गावात अनेक विकासकामे झाली, या सगळ्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तोरस्कर यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: