सातारा 

…आणि १०० बेडचे कोरोना सेंटरच चोरीला गेले

सातारा (महेश पवार) :

विहीर चोरीला गेली होती… मकरंद आनासपुरेंच्या चित्रपटात आपण पाहिले व पोट धरून हसून मनोरंजन करुन घेतले.पण चक्क शिरवळ औद्योगिक वसाहतीतील तब्बल ६० कंपन्यांनी मिळून वडवाडी ता.खंडाळा जि .सातारा येथील खंडाळकरांच्या सेवार्थ उभारलेले १०० बेडचे कोरोना केअर सेंटर एकाही रुग्णाच्या उपचारापूर्वीच चोरीला गेल्याची तक्रार भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस अनुप सुर्यवंशी व पदाधिकारी यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे.

दि.२३/०८/२०२० रोजी वडवाडी ता.खंडाळा जि.सातारा येथे अभिनव विद्यालय मध्ये नीरा व्हॕली मॕन्युफॕक्चरर्स असोसिएशन , सातारा जिल्हाधिकारी , आणि तालूका स्थानिक प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने उभारणी केलेल्या १०० बेडच्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात तहसिलदार दशरथ काळे , शिरवळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक उमेश हजारे , नीरा व्हॕलीचे अशोक जाधव व परिसरातील सर्व कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले होते.

त्यावेळी नीरा व्हॕली असो.मधील गोदरेजसह एकूण ६० कंपन्यानी एकत्र येऊन प्रशासनास सहकार्य म्हणून व कोरोना बाधितांच्या सेवेसाठी हे कोरोना केअर सेंटर उभारले असून व्यवस्थापनाची सर्व जवाबदारी सरकारी यंत्रणेकडे सुपुर्द केल्याचे नीरा व्हॕली असो.तर्फे जाहिर करणेत आले होते. त्याचबरोबर सेंटरसाठी लागणारी आर्थिक व व्यवस्थापकीय मदत नीरा व्हॕली असो.मधील सर्व कंपन्या मिळून करणार असल्याचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी जाहिर केले होते.तर हे कोरोना केअर सेंटर अत्यावश्यक वेळी प्रशासनासाठी सहकार्य ठरणार असल्याचे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी तालुका प्रशासनाचे वतीने तहसिलदार  दशरथ काळे यांनी केले होते.

परंतु आता कोरोनाचा महाभयंकर प्रकोप खंडाळ्यावर होत असताना शिरवळ येथिल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना केअर सेंटरचे तत्कालीन उद्घाटक तहसिलदार दशरथ काळे यांचेकडे चौकशी साठी गेले असता कोणतेहि समाधानकारक उत्तर मिळाले नाही.त्यानंतर वडवाडी येथिल अभिनव विद्यालयाचे सेंटरचे जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली आसता सेंटरचे अस्तित्व वा अस्तित्वाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत.त्यामुळे उद्विग्न व संतप्त झालेल्या भाजपा ओबीसी सेल सरचिटणीस अनुप सुर्यवंशी व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी सदर कोविड सेंटर चोरीस गेले असल्याचि फिर्याद दाखल करुन संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून जवाबदार आधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करणेबाबत निवेदन शिरवळ पोलिस ठाणेस दिले आहे व त्याच्या प्रती मुख्यमंत्री यांचेसह सर्व अधिकारी ,पदाधिकारी यांना  दिल्या आहेत.

कोरोना केअर सेंटर उभारणी करणाऱ्या  कंपन्या हयात आहेत ,कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे तहसिलदार ,आरोग्य अधिकारी ,पोलीस अधिकारी व सर्वच प्रशासकीय अधिकारी त्याच विभागात त्याच पदांवर कार्यरत आहेत , पाहुणा म्हणून आलेला कोरोनाही अनेक लाटांच्या प्रवाहात खंडाळ्याची वाताहात करित दबा धरून तसाच बसून आहे परंतु अस्तित्वात नाही ते वडवाडी येथिल कोरोना सेंटर… मग ते आभाळाने खाल्ले कि धरतीने गिळले कि वाऱ्याने उडुन गेले या विवंचनेत समस्त खंडाळकर आहेत . ज्यांनी बाप म्हणून देखभाल करायची तेच कोरोना बाधितांना वरदान ठरु पाहणारे व कंपन्यांच्या दातृत्वाची निशाणी असणारे अख्खे कोरोना सेंटर गिळंकृत करुन मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खात असतील तरआम्ही कोणाकडे बघायचे असा सवाल खंडाळ्यातील जनता करित आहे व संबंधितांना याचा जाब द्यावाच लागेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: