सिनेनामा

‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल

मुंबई​ :
झी-चित्रमंदिर या झी-एंटरटेन्‍मेंट एंटरप्राईजेज लि.च्‍या नवीन मराठी चित्रपट वाहिनीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हे चॅनेल लाँचच्‍या एका आठवड्याच्‍या आतच फ्री डिश व्‍यासपीठावर पहिल्‍या क्रमांकाचे चॅनेल म्‍हणून उदयास आले आहे. मराठी-भाषिक क्षेत्रातील दोन-तृतीयांश बाजारपेठेला व्‍यापून घेणारे झी-चित्रमंदिर महाराष्‍ट्रातील फ्री डिश व्‍यासपीठावर सर्वाधिक पाहण्‍यात आलेले चॅनेल ठरले. झीच्‍या मराठी चॅनेल पोर्टफोलिओमधील नवीन चॅनेल झी-चित्रमंदिर नॉन-स्‍टॉप मसाला हिट्स, लक्षवेधक नाट्य आणि रोमांचक चित्रपटांपासून हलक्‍या-फुलक्‍या कॉमेडीज व भक्‍तीमय मेजवानी च्‍या खास निर्मितीपर्यंतच्‍या ६०० हून अधिक लोकप्रि‍य चित्रपटांच्‍या सर्वात मोठ्या व संपन्न लायब्ररीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील दर्जेदार मोफत मेजवानीची पूर्तता करते.

​​

भारतामध्‍ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेतात. या मनोरंजन घेण्‍याच्‍या सवयीची पूर्तता करण्‍यासाठी झी-चित्रमंदिरने मनोरंजनपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली आहे, जे कुटुंबाला चित्रपटगृहासारखा चित्रपट पाहण्‍याचा अनुभव देतात. चॅनेल प्रेक्षकांचे मनसोक्‍त मनोरंजन करण्‍याच्‍या एकमेव उद्देशासह आठवडाभर रोमांचक मनोरंजनाचा आनंद देते. चॅनेलच्‍या सादरीकरणाच्‍यावेळी महाराष्‍ट्रामध्‍ये खूपच लोकप्रि‍य ठरलेला चित्रपट ‘सैराट’ दाखवण्यात आला, त्यानंतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दाखवण्यात आले. दर्जेदार चित्रपट देण्यासोबतच झी-चित्रमंदिरने तयार करण्यात आलेली भक्तिमय मेजवानी दिवसभर मनःशांती व मनोरंजन गरजांची पूर्तता करते

झी-एंटरटेन्‍मेंट एंटरप्राईजेज लिमिटेडच्या नॉर्थ, वेस्ट- अँड प्रि‍मिअम चॅनेल्सचे क्लस्टर प्रमुख अमित शाह म्हणाले, ‘’आम्हाला महामारीदरम्यान झी-चित्रमंदिर चॅनेल लाँच केल्यानंतर देखील या चॅनेलला प्रेक्षकांकडून मिळालेल्‍या अभूतपूर्व प्रतिसादाचा खूप आनंद झाला आहे. फ्री डिश चॅनेल म्‍हणून झी-चित्रमंदिरने अल्पावधीतच दर्जेदार व सर्वसमावेशक चित्रपट कन्टेन्ट सादर करत महाराष्‍ट्रातील चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. झी मध्ये आम्ही प्रेक्षकांच्या प्रथम दृष्टिकोनाशी कटिबद्ध आहोत. ज्यामुळे आम्हाला मराठी मनोरंजन विभागामध्ये दोन-तृतीयांशहून अधिक बाजारपेठ प्राप्त करत अग्रणी स्थान संपादित करण्यामध्ये मदत झाली आहे. झीचे मराठी क्लस्टर प्रत्येक आठवड्याला ४३.८ दशलक्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करते.”

zee-chitramandirझी-चित्रमंदिरच्या पदार्पणामुळे महाराष्‍ट्रातील ८० टक्‍के चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांची मनोरंजनातील पोकळी भरून निघाली आहे. चित्रपट ‘सैराट’ च्या भव्य प्रिमिअर नंतर झी-चित्रमंदिर प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिल. या श्रेणीमध्ये प्रेरणादायी चित्रपट ‘डॉ.प्रकाश बाबा आमटे’ व ‘केसरी’, विनोदी चित्रट ‘आलटून पालटून’ आणि प्रेमकथा ‘गस्त’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासंदर्भातील आवडीबाबची जाण असल्यामुळे आगामी सप्ताहामध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट महोत्सवाची श्रुंखला तयार करण्यास मदत झाली आहे. जसे ‘अशोक सराफ्स बर्थडे’, ‘जोडीचा मामला फिल्म फेस्टीवल’ आणि ‘वटपौर्णिमा स्पेशल’.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: