गोवा 

प्रवीण आर्लेकरांनी दिला ‘त्या’ कुटुंबाला मदतीचा हात

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
खासदार तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव हा संसद ग्राम साठी आदर्श ग्राम म्हणून निवड केली होती , मोठा गाजावाजा झाला , आता पर्यंत आदर्श ग्राम झाला असेल तर सर्व समस्या सुटाव्या व्हायला हव्या होत्य. याच मतदारसंघाचे लोकप्रतीनिधीत्व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर करत आहे. आणि याच आदर्श गावात दलित वस्तीतील सगुण कदम या कुटुंबियाला, ना घर ना पाणी ना वीज. त्यामुळे त्यांच्या मदतीला धावून आले मगोचे नेते प्रवीण आर्लेकर. आणि झोपडीला आसरा दिला , झोपडीला पत्रे चढले. यावेळी मगोचे प्रवीण आर्लेकर , मोपा उपसरपंच सुबोध महाले , माजी सरपंच चंद्रशेखर खडपकर आदी उपस्थित होते.

मागच्या महिन्यात मतदारसंघाचा दौरा करताना नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना सगुण कदम यांची समस्या मगोचे प्रवीण आर्लेकर यांनी ऐकून घेतले आणि त्याना आधार दिला. पेडणे  राखीव असलेल्या मतदारासंघातील इब्राह्मपूर येथील सगुण कदम अजूनही हलाखीचे जीवन जगत होता. झोपडीतच राहत होता. त्याला घर नाही. पाणी, वीज नाही. मुलभूत गरजापासून वंचित असलेल्या कदमला  मगो नेते प्रवीण आर्लेकरकडून आर्थिक मदत दिली आणि दिलेला शब्द पाळला.

गोवा राज्याचे हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण होत असतानाच अजूनही दुसऱ्या बाजूने राखीवता असलेल्या सध्याचा पेडणे मतदारसंघातील इब्राह्मपुर गावात अजूनही सगुण कदम  या व्यक्तीला घर, पाणी व वीज नाही. हे कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही.  मात्र हि सत्यस्थिती आहे .

गोवा स्वातंत्र होऊन आज ६० वर्षे उलटली तरी गोव्यात दारिद्र्य रेषेखाली अनेक कुटुंब आहेत. त्यावेळी कोणाला दोषी ठरवायचे असा प्रश्न उभा राहतो. पेडणे तालुक्यातील इब्राह्मपुर गाव हा गोव्याचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी आदर्श गाव म्हणून दत्तक घेतले होते. अशा  गावात जेव्हा दारिद्ररेषेखाली कुटुंब दिसते  आणि ते कुटुंब पाणी वीज आणि घरासाठी वंचित राहते तेव्हा मात्र सरकारच्या विकासाच्या बाता फोल ठरतात. आणि लोकप्रतिनिधी कमी पडले असे जाणवते.

पेडणे  मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर गेली वीस वर्षे या भागाचे नेतृत्व करत आहे. ते आपल्या भाषणात जनतेचे सेवक, नोकर म्हणून आपल्याला उपमा देतात मात्र त्यांच्यात मतदारसंघात सगुण कदम सारखा व्यक्ती अजूनही झोपडीत राहतो त्याला घर नाही, पाणी नाही, वीज नाही त्यावेळी मंत्र्याच्या भाषणाचा अर्थ काय उरतो, असा प्रश्न स्थानिक विचारतात.

या पार्श्वभूमीवर मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी नुकत्याच वादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या इब्रामपूर गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी इब्राह्मपुर गावात  ते गेले त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सगुण कदम हा नागरिक हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती दिली. प्रवीण आर्लेकर यांनी लगेचच सगुण कदम यांच्या झोपडीला भेट दिली व ती झोपडी दुरूस्त करण्यासाठी आर्थिक मदत सगुण कदम यांनी दिली व कार्यकर्त्यांना त्यांची झोपडी व्यवस्थित पत्रे घालून बांधून देण्यासाठी सांगितले.

यावेळी बोलताना प्रवीण आर्लेकर म्हणाले की, या भागाचे विद्यमान आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर चार वेळा म्हणजे वीस वर्षे या मतदारसंघातुन निवडून येतात व याच मतदारसंघात सगुण कदम सारखी व्यक्ती त्यांना दिसत नाही.  जी व्यक्ती अनुसूचित जातीची आहे. गरीब आहे. त्याला आधार नाही.  आणि त्यांचा विकास व्हावा यासाठीच हा मतदारसंघ राखीव ठेवला आहे मात्र कुठे विकास झाला. कोणाचा झाला. याला काय म्हणावं?  बाबू आजगावकर यांनी या मतदारसंघात केवळ राजकारण केले, समाजकारण केले नाही. समाजकारण केले असते तर त्याला सगुण कदम सारखी व्यक्ती दिसली असती.

सगुण कदम यांनी प्रवीण आर्लेकर यांचे आभार मानून आजपर्यंत आम्हाला कुणीच मदत केली नव्हती , मात्र प्रवीण आर्लेकर यांनी मदत करून आधार दिला , नाहीतर या पावसाळ्यात जगणे कठीण होवून बसले असते असे ते म्हणाले .

मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी बोलताना आर्लेकर यांनी जे आश्वासन कदम याला दिले होते ते पूर्ण केले , जे इथल्या लोकप्रतिनिधी करणाऱ्या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी करायला हवे होते ते केले नाही , मात्र प्रवीण आर्लेकर हे आमदार नसतानाही हि समस्या सोडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: