सातारा 

‘साताऱ्याच्या ‘स्मार्ट’नेससाठी भेटणार पंतप्रधानांना’

सातारा (महेश पवार) :

शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत. याबाबत पीएमओ कार्यालयाशी चर्चा झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही भेटून सातारा पॉटेबल वॉटर चा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहोत. त्यासाठी लागतील ते प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही स्वतः करणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा जिल्हयातील शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. सध्या केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालयांमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्मार्टसिटी होण्यासाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या स्मार्ट सुविधांचा उपयोग सामान्यांपासून सर्वांनी होईल. विकासाकडे झेपावयाचे असल्यास, आपली दिनचर्या खरोखरच स्मार्ट करणे आवश्यक होणार आहे. या स्मार्ट सुविधांचा सदुपयोग देखिल रोजच्या रोज करणे तितकेच जरुरीचे असणार आहे. स्मार्टसिटी करीता पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटून विशेष विनंती करणार आहोत. साता-या विषयी त्यांना विशेष आस्था आहे. त्यामुळे सातारकरांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टीकोनातुन स्मार्ट सिटी बनवण्याकरीता आम्ही प्रयत्न करणार​ असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सातारा जिल्हयात ११ धरणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक बंधारे,के.टी.वेअर आहेत. तथापि भौगालिक परिस्थितीमुळे पश्चिमभाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, पॉटेबल वॉटरचा​ ​प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प साता-यात राबविणेत येणार आहे. त्याकरीता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटुन त्यांना तसा प्रस्ताव देण्यात येईल आणि जरूर तो पूर्ण होईल​, याबद्दलही त्यांनी यावेळी खात्री दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: