गोवा 

आमदार सोपटेंनी दिले शेतीसाठी ट्रॅक्टर

पेडणे :
मांद्रे येथील शेतकर्यांना शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टर आज आमदार दयानंद सोपटे यांनी उपलब्ध करून दिले व शेती नागरी कामाला सुरुवात करण्यत आली .यावेळी आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शेती नांगरी कामाला मांद्रे येथे सुरु करण्यात आला. यावेळी आमदार दयानंद सोपटे व स्थानिक नागरिक सुनील आसोलकर आपले मनोगत व्यक्त केल्या . आमदार दयानंद सोपटे यांनी सध्या दोन ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहे आणि एक ट्रॅक्टर लवकरच उपलब्ध करू देणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, मछिंद्र पेडणेकर ,सुनील आसोलकर अजय मांद्रेकर ,गोविंद आजगावकर व आदी शेतकरी उपस्थित होते.

‘’शेती खात्याचे मंत्री बाबू कवळेकर यांनी शेतकर्यांना प्राधान्य व पुढे आणण्यासाठी नवीन योजनाच्या सुरु केल्या आहेत, सर्व सुविधा खत असे मिळून ९० टक्के सबसिडी देण्याचे आव्हान केले आहेत .जे काही योजना आहेत ते आपल्या पर्यत घेऊन येण्याचे काम आपण करणार , व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सहकार्य भरपूर मिळत आहे त्यामुळे आपण माद्रे मतदार संघात अनेक विकास कामे होत आहेत .आम्ही तोडाने कृषी प्रधान देश किवा राज्य  म्हटले म्हणून होत नाही म्हणणे खूप सोप आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेती लागवड करण्यासाठी प्रवृत्त करण्याची काळाची गरज आहे. मांद्रे मतदार संघात ज्या गावत जास्त शेतकरी आहेत आणि शेती पडीक होत्या त्या शेतात पुन्हा शेतकरी पिक लागवड करावे या हेतूने गेल्यावार्षापासून पावसाळ्यात वायगण जे शेती करतात त्यांना बियाणे व खत दिल्या.  मला भेदभाव करायचा नाही आहे . शेत्कार्याबरोबर राजकार करू नये राजकारण करायचं आहे ते निवडणूक वेळी आता नाही. शेतकर्यांच्या बाबतीत अजून पर्यत आपण राजकारण केला नाही आणि करणार पण नाही . गेल्या वर्षी मांद्रे मतदार संघातील आठ पंचायतीतील  २०५० शेतकरी होते यावर्षी २८५० शेतकरी शेती करतात जवजवळ ८०० शतकरी नवीन तयार झाले आहेत सांगताना उमेद दिसते कि आपले शेतकरी शेती करण्यासाठी पुढे येत आहेत त्यानी असेच पुढे यावे त्यांना जे काही मदत लागेल आमदार मदत व  सहकार्य करण्यासाठी तयार आहे .गेल्यावर्षी शेतकर्यांना बियाणे खत दिल्या यापुढे ही देणार ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यत साथ दिलात यापुढे साथ मिळेल . गावातील ग्रामदेवत व लोकांच्या सहकार्याने आपण दुसर्यांदा आमदार बनू शकलो . असे आमदार दयानंद सोपटे म्हणाले .

आज खूप बर वाटत कि आमदाराने ज्यावेळी गरज होती त्याच वेळी ट्रक्टर उपलब्ध करून दिले .यापूर्वी आम्हाला खूप त्रास व्हायचे बैलाचे जोते बांधून नांगरीकारण करणे जर काही झाल तर सुताराला सोधावे लागायचे .ते आता त्रास कमी झले सरकारच्या माध्यमातून तसेच दयानंद सोपटे यांना शेतकर्याची काळजी खूप आहे आणि ते स्वता शेतकरी असल्याने एक तळमळ आहे म्हणू त्यानी शेतकर्यांना बियाणे खत अने योजना उपलब्ध करून देत आहेत . शेती करणार तर अनेक सरकारी योजना आहेत त्या  योजना मिळून देण्यसाठी आमदार आपल्यावारोबर आहेत त्यमुळे आम्ही शेतकऱ्यांनी शेती न सोडता शेती करूया आणि मांद्रे मतदारसंघ हरित करूया असे स्थनिक नागरिक सुनील आसोलकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: