क्रीडा-अर्थमत

कॅनन इंडीयाचा घरगुती वापरासाठी नवा प्रिंटर

मुंबई :
फोटो स्टुडिओज, व्यवसाय, घर आणि सर्जनशील कामात उच्च दर्जा, अधिक चांगली फोटो लाँगेटिव्हिटी आणि कमी खर्चातील प्रिंटिंगच्या क्षमता उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने कॅनन इंडियाने दोन नव्या PIXMA G सीरिज 6-कलर इंक टँक प्रिंटर्सची रचना करण्यात आली आहे.

कन्झ्युमर इमेजिंग उत्पादन विश्वातील दशकानुदशकाच्या आधुनिक रंगविज्ञानाच्या ताकदीचा लाभ घेत नव्या G सीरिज फोटो प्रिंटर्समुळे इतकी वैविध्यता आणि संपन्न परिणाम मिळतात जे आजवरच्या इंक टँक प्रिंटर्समध्ये कधीही मिळालेले नाहीत. प्रोफेशनल फोटोग्राफर्स, फोटो स्कुल आणि आधुनिक काळातील हौशी फोटोग्राफर्सना विविध प्रकारच्या कागदांवर अप्रितम इमेजच्या प्रिंट घेणे शक्य करणाऱ्या imagePROGRAF PRO-300 आणि PIXMA PRO-200 या दोन प्रिंटर्समध्ये प्रोफेशनल फोटो आणि प्रदर्शनाच्या पातळीचे A3+ आकारापर्यंतचे प्रिंट्स घेण्यासाठी आवश्यक कॅननचे आधुनिक तंत्रज्ञान आहे.

 

नव्या प्रिंटर्सच्या सादरीकरणाबद्दल कॅनन इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनाबू यामाजाकी म्हणाले, “जागतिक महासंकटाचे सावट अजूनही देशावर आहे. जवळपास प्रत्येकजणच दूरस्थ पद्धतीने काम करत असताना त्यांचा कामाचा अनुभव अधिक वृद्धिंगत करतील असे पर्याय उपलब्ध करून देण्यास कॅनन इंडिया बांधिल आहे. एक परिपूर्ण पर्याय प्रदाता म्हणून अगदी जीवंत वाटावेत असे क्षण पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आमच्या इमेजिंग तंत्रज्ञानाचा आणि त्या खास, सुंदर क्षणांना बहुरंगी, फ्रेम करण्यायोग्य फोटोंमध्ये बदलण्यासाठीच्या आमच्या प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा आम्हाला अभिमान आहे. स्मार्ट प्रिंटिंग पर्यायांसह ग्राहकांना आनंद देण्याच्या आमच्या प्रवासातील सातत्य म्हणून आमच्या नव्या प्रिंटर्सच्या सादरीकरणामुळे आमच्या फोटो प्रिंटर्सच्या पोर्टफोलिओला अधिक बळकटी मिळणार आहे. आम्हाला आशा आहे की आमचे हे चार नवे प्रिंटर्स अत्यंत नाविन्यपूर्ण, योग्य दरातील आणि उत्पादक पर्यायांनीआमच्या ग्राहकांच्या प्रिंटिंग गरजांसाठी समृद्ध अनुभव निर्माण करतील.”

 

या नव्या उत्पादनांबद्दल कन्झ्युमर सिस्टम प्रोडक्ट्स अॅण्ड इमेजिंग कम्युनिकेशन प्रोडक्ट्सचे संचालक सी सुकुमारन म्हणाले, “एक ख्यातनाम इमेजिंग कंपनी म्हणून कॅननमध्ये आम्ही आमच्या उत्पादन आणि पर्यायांच्या माध्यमातून आमच्या वापरकर्त्यांमध्ये फोटो प्रिंटिंगच्या संस्कृतीला चालना देण्यावर विश्वास ठेवतो. रंग भावविश्वाच्या अत्युच्च्य दर्जासह आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा सुंदर आठवणी प्रिंट करण्यात आमच्या ग्राहकांना साह्य करणे हा आमचा उद्देश आहे. वापरकर्त्यांना स्मार्ट प्रिंटिंग पर्याय देऊन त्यांच्या उत्क्रांत होणाऱ्या फोटो प्रिंटिंग गरजा भागवण्यासाठी खास या फोटो प्रिंटर्सची रचना करण्यात आली आहे.तसेच अतिरिक्त वापरकर्तास्नेही वैशिष्ट्ये आणि नव्या स्वरुपातील डिझाइनमुळे या नव्या प्रिंटर्समध्ये वरच्या दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य दर यांचा योग्य मेळ साधत अंतिम ग्राहकाला सुयोग्य सेवा दिली जात आहे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: