गोवा 

‘गोव्यातील मान्सून’वर उद्या वेबिनार

पणजी :
११ जून रोजी संध्या ४.०० वाजता ‘गोव्यात पावसाळ्यातील हवामान बदलाची वैशिष्ट्ये आणि हवामान बदलाचा परिणाम’ या विषयावर आधारित वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमांतर्गत माहिती आणि प्रसिध्दी खात्याने या वेबिनारचे आयोजन केले आहे.

पावसाळ्यात विशेषत: पूरग्रस्त भागात, दरड कोसळणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यासाठी तसेच  पुरामुळे व पावसामुळे जीवन व मालमत्तेचे होणारे इतर नुकसान यासंबंधी लोकांना माहिती देणे हा या वेबिनारचा उद्देश आहे. हे वेबिनार लोकांसाठी खुले राहील.

निवृत्त आयआयटीएम ज्येष्ठ वैज्ञानिक आणि आयएमएसचे  माजी अध्यक्ष (पुणे) डॉ जे आर कुलकर्णी हे मराठी आणि इंग्रजी भाषेतून गुगल मीटव्दारे वरील विषयावर बोलतील. हवामानाच्या विविध प्रकारांवरही ते बोलतील.

गोवा राज्यात पावसाळा सुरू झाल्यावर लोकांच्या मनात अनेक शंका व प्रश्न निर्माण होतात. या हंगामाशी संबंधित वास्तविकता आणि अचूक माहिती प्रदान करण्यासाठी हवामान विषयावर वेबिनारव्दारे सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

http://meet.google.com/fcx-bbbn-yup अशी वेबिनारची व्हीडियो कॉल लिंक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: