गोवा 

‘मुरगाव’ स्थायी समिती अध्यक्षपदी दीपक नाईक

मुरगाव (प्रतिनिधी) :
मुरगाव नगरपालिकेच्या नवीन मंडळाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी दीपक नाईक यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी अन्य सहा उपसमित्या निवडण्यात आल्या.

मुरगाव नगरपालिकेच्या नवीन मंडळाची स्थायी समिती व अन्य सहा उपसमित्या निवडण्यासाठी (दि.१०) गुरुवारी मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीतील जनता वाचनालयात नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. पालिका मंडळ स्थापन झाल्यानंतरची ही प्रथमच बैठक होती. ज्या नगरसेवकांना समितीवर येण्याची इच्छा आहे त्यांना काल बुधवारी अर्ज भरण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानुसार स्थायी समिती व अन्य सहा उपसमित्यासाठी एकूण २१ नगरसेवकांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यानुसार सर्व अर्ज ग्राह्य धरून स्थायी समिती व अन्य सहा उपसमित्या निवडण्यात आल्या.
१) स्थायी समिती- दीपक नाईक (चेअरमन), फेड्रीक हेंन्रीक्स, यतीन कामुर्लेकर, दामोदर नाईक, विनोद किनळेकर, लिओ रोड्रिक्स.
२) शिक्षण समिती- मंजुषा पिळणकर (चेअरमन), नारायण बोरकर, कुणाली पार्सेकर,
३) मार्केट समिती- मातायस मोंतेरो (चेअरमन) दयानंद नाईक, प्रजन्य मयेकर.
४) स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समिती- प्रजय मयेकर (चेअरमन), अमेय चोपडेकर, विनोद किनळेकर.
५) घनकचरा व्यवस्थापन समिती- नारायण बोरकर (चेअरमन), रामचंद्र कामत, कुणाली पार्सेकर,
६) विकास समिती- रामचंद्र कामत (चेअरमन), अमेय चोपडेकर, श्रद्धा महाले.
७) जैव विविधता व्यवस्थापन समिती- यतीन कामुर्लेकर (चेअरमन), कातारिना झेवियर, कुणाली पार्सेकर, देविता आरोलकर, दामोदर नाईक, अमेय चोपडेकर.
दरम्यान आजच्या बैठकीत विरोधी गटाच्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर व योगिता पार्सेकर गैरहजर राहिल्या. तसेच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रिया राऊत याही गैरहजर राहिल्या. त्यांचे एकाचेही या समितीत नाव नाही. तसेच भाजपचेच दाबोळी मतदार संघातील प्रभाग २२ चे नगरसेवक सुदेश भोसले यांचेही एकाही समितीत नाव नाही. सुदेश भोसले हे मंत्री मावीन गुदिन्हो यांचे कट्टर समर्थक असून त्याला या समितीतून वगळण्यात आल्याने त्यांच्या गटात नाराजी पसरली आहे. हा एक प्रकारे अन्याय असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.
आजच्या बैठकीस मुख्याधिकारी जयंत तारी नगराध्यक्ष दामोदर कासकर व उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले उपस्थित होत्या.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: