सातारा 

‘होय, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे’

कराड (अभयकुमार देशमुख) :
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २२ वा वर्धापन दिन. शरद पवार साहेबांनी आजच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची बातमी विठठलराव देशमुख (आबा ) ना दाखवली. तेव्हा त्यांनी मला शरद पवारसाहेबांबद्दल आणि पक्ष स्थापनेनंतरचे अनेक किस्से सांगितले. आणि  ‘होय, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे ‘ असे ते अत्यंत अभिमानाने आजही सांगतात.

मागील ४० वर्षाहून अधिक काळ आमचे आबा शरद पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. हे केवळ त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या प्रेमामुळेच… ते नेहमी सांगतात यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा फक्त पवारसाहेबच चांगले चालवत आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिले अधिवेशन १ आणि २ ऑक्टोंबर २००० ला नागपूरला झाल्याची… आणि त्या अधिवेशनाला सातारा जिल्ह्यातल्या पवारसाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते दिवंगत अनिल गुजर, सद्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कराड शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नंदकुमार बटाने, विजय जगताप, राजाराम जगताप, रेठ-याचे आबा मोहिते, हेमंत धर्मे आणि मी उपस्थित असल्याच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी तिथे उपस्थित प्रतिनिधीना देण्यात आलेली एक फाईल त्यांनी दाखवली. त्यावेळचे स्वागताध्यक्ष आणि आता पवारसाहेबाना सोडून भाजपमध्ये दाखल झालेले. बबनराव पाचपुते होते. त्या फाईलवर त्यांचे नाव आणि स्वागताध्यक्षांचे छापील भाषणाची प्रत आजही त्यांनी जपून ठेवली आहे. आणि त्यासोबत त्यांनी जपून ठेवलेले नरुभाउ लिमये संपादक असलेले ‘गतिमान’ साप्ताहिकसुध्दा दाखवले. आणि त्यावर तारीख २६ फेब्रूवारी १९८४ आहे. या फाईलवर पवारसाहेब , पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांचे फोटो आहेत.

NCPजुन्या आठवणी सांगताना मुंबईतील शिवाजी पार्कची सभा, औरंगाबाद, पुणे, सारख्या ठिकाणी साहेबांचे कार्यक्रम आणि जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमाला उपस्थित असताना आलेले अनुभवही आबानी सांगितले. सोबत पवार साहेबांना पक्षातले किती हौशे, गवसे, नवसे नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते साहेबांना कधीच सोडून जाणार नाहीत. आज राष्ट्रवादी पक्ष म्हणजे आमचीच मालकी असल्याच्या अविर्भावात वागणारे नेते आणि त्यांचे हवेत असणारे बगलबच्चे यांनी पक्ष कसा उभा राहिला. त्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी काय कष्ट केलेत याचे भान ठेवले पाहिजे.  आणि  पवारसाहेबांसाठी धडपडणाऱ्या जुन्या कार्यकर्त्याना या नेत्यानी विसरु नये, अशी अपेक्षाही आबांनी व्यक्त केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: