गोवा 

”तौक्ते’ची नुकसान भरपाई कधी मिळणार?’

पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे तालुक्यातील चक्रीवादळाने केलेली नुकसानी सरकारने त्वरित द्यावी ,त्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी ,पेडणे तालुका नागरिक समितीचे  तथा धारगळ मोपा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक भारत बागकर यांनी केली आहे. 15 व 16 रोजी दोन दिवस चक्री वादळ येऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात  नुकसानी झाली आहे ,नुकसान झालेले नागरिक आपली नुकसानी आज मिळणार उद्या मिळणार या प्रतीक्षेत आहेत मात्र नुकसानी मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात .

दरम्यान वादळ होऊन महिना होत आहे , लगेच चार दिवसांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तुये हॉस्पिटल परिसरसत आले होते, त्यावेळी  लवकरात लवकर नुकसानी देण्याचे आश्वासन दिले होते . आणि तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांना अहवाल देण्याचा आदेश दिला होता. कृषी विभागाने जी नुकसानी शेतकऱ्यांची झाली त्यांची यादी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेली आहे. आता सरकारने नुकसानी लवकर देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बागकर यांनी केली आहे .

भारत बागकर
भारत बागकर

तौकते चक्रीवादळाचा तडाखा पेडणे तालुक्याला पूर्णपणे बसला असून पाच दिवस जनजीवन विस्कळीत झाले  होते.  वीज पाणी , दूरध्वनी, इंटरनेट सेवा तब्बल पाच दिवस गायब झाली होती  त्यामुळे कुठे काय काय झाले , कुणाच्या घरावर झाडे पडून त्याना मदतिची गरज  लागली तरीहि ते संपर्क करू शकत नव्हते , बाहेर चक्रीवादळ त्यामुळे कुणी कुणाच्या मदतीसाठी घरातून कसे बाहेर पडणार होते. ही स्थिती पेडणेवासीयांनी अनुभवली .आपत्कालीन प्रशासन यंत्रणाही कुचकामी ठरली , पाच पाच दिवस वीज , पाणी , संपर्क माध्यमे  तुटली ती विस्कळीत सेवा सुरळीत करण्यासाठी सरकारी यंत्रणा निष्क्रिय ठरली त्याबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करत होते,  या वादळाने पेडणे तालुक्यातील कष्ठातुन उभी केलेली शेतकऱ्यांची शेती , बागायती , केळी , आंबे काजू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली , प्राथमिक स्थरावर किमान ८० लाख रुपयांची नुकसानी झाल्याची माहिती पेडणे कृषीअधिकारी प्रसाद परब यांनी दिली .

दोन हेक्टर पेक्षा जास्त वायगण शेती , कापणी करण्यासाठी सज्ज होती , त्यावरही निसर्गाने घाला घालून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढून घेतला आहे . हि शेती पूर्णपणे पाण्यात गेली. पेडणे तालुक्यात गेल्या वर्षी पूर येवून अडीच  कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते , त्यातील काहीना पैसे मिळाले तर काही अजून प्रतीक्षेत आहेत , पूर्वीची नुकसानी मिळाली नसतानाच परत्त एकदा शेतकऱ्यांना ८० लाखाची नुकसानी सोसावी लागणार आहे . स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या भागाची पाहणी केली व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले .

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश समजला जातो ,आणी त्यातील पेडणे तालुक्यात काही युवा शेतकरी आपल्या शेतात हरित क्राती करण्यासाठी धडपडत आहे.

मागच्या दोन वर्षापूर्वी व गेल्यावर्षी वादळी पावसाने आणि पूरग्रस्त स्थितीतीतून शेतकऱ्यांची  दाणादाण उडवली आहे किमान साडेसातशे शेतकऱ्यांनाचे नुकसान झाले होते   अडीच कोटी रुपयांची नुकसानी झाली होती ,त्यातील अजून 90 शेतकऱ्यांना नुकसानी मिळाली नाही अशी माहिती पेडणे कृषी विभागीय अधिकारी प्रसाद परब यांच्याकडे संपर्क साधला असता दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: