गोवा 

”नदी परिवहन’च्या शिरसईकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा’

पेडणे (प्रतिनिधी) :
स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून रेती माफियांना हाताशी धरून कामुर्लीत  आणलेल्या तरंगत्या जेटिला कदापि  थारा देणार नसल्याचे कामुर्लीचे  माजी सरपंच शरद गाड यांनी सांगितले.

रेती माफियांना धमकावून  प्रेमलाल शिरसईकर व सागर शिरसईकर ही जेटी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शापोरा नदी ही आमची आई आहे तिचा असा सौदा आम्ही होवू देणार नाही आधीच नदीत बेकायदा रेती उपसा करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शिरसईकर बंधूंनी रेती माफियांच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचारी मार्गाने लाखो रुपयांची कमाई केली आहे. नदीवर जीवन जगणाऱ्यांचे जीवन उध्वस्त केले आहे आणखी ते आम्ही उध्वस्त होवू देणार नाही. असे सांगून याला जबाबदार असणाऱ्या नदी परिवहन खात्यामध्ये उपकप्तान असलेल्या प्रेमलाल शिरसईकर यांच्या मालमत्तेची  चौकशी दक्षता खात्याने करावी अशी मागणी आपण करणार असल्याचे ते म्हणाले. माझ्या या आरोपाची तथ्यता जाणून घ्यायची असेल तर प्रेमलाल व त्याचा भाऊ सागर याच्या फोनची चौकशी करावी त्यांचा कुणाकुणाशी संपर्क झाला याची सविस्तर माहिती घ्यावी तसेच त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी करावी.  त्यातून निश्चितच सत्य काय ते समोर येईल.

शरद गाड
शरद गाड

यासंदर्भात बोलताना गाड पुढे म्हणाले. काल जेटी स्थलांतराच्या वेळी आपण,स्थानिक आमदार नीलकंठ हळर्णकर,  सरपंच विशांत गावकर तसेच अन्य नागरिकांसह घटना स्थळी होतो.स्वतःला कामुर्ली तील श्री पोरेश्र्वर देवस्थानचे पदाधिकारी आणि रेती असोशियेशनचे सर्वेसर्वा म्हणवणाऱ्या नवेश खोर्जुवेकर यांनी जेटीचे समर्थन केले होते. जेटीचा ताबा आमच्याकडे दिल्यास आम्ही त्याचा सांभाळ करू असे सांगतात त्यांना आमचा असा प्रश्न आहे की? शापोरा नदी काय  देवस्थान किंवा रेती उपसा करणाऱ्यांच्या बापाची आहे जे स्वतःची मालमत्ता असल्यासारखे वागतात? त्यांना जर जेटी ठेवायची असेल तर त्यांनी देवस्थानाच्या जागेत किंवा आपल्या घरी ठेवावी. शापोरा नदीत ही जेटी आम्ही कदापि ठेवू देणार नाही.असे सांगून ते पुढे म्हणाले

स्वतःच्या स्वार्थासाठी कामूरली वासियांचा बळी मी जावू देणार नसल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आम्हाला योग्य तो न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही मोजक्या लोकांच्या स्वार्थासाठी आमची शापोरा नदी उध्वस्त होवू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: