गोवा 

‘आरोग्य संवर्धनासाठी लावा झाडे’

पेडणे (प्रतिनिधी) :
​आरोग्य हि सर्वांची धनसंपदा आहे , त्यासाठी आम्हाला पूरक वातावरण तयार करायला हवे ,आरोग्याचा थेट संबध पर्यावरणाशी येतो . त्यामुळे झाडाचे महत्व लक्षात घेवून एक झाड कापले तर त्या बदल्यात पाच नवीन झाडे लावायला हवीत , त्यातून आम्हाला स्वच्छ हवा मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल . त्या साठी कार्यरत राहूया असे प्रतिपादन पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी पेडणे नानेरवाडा येथील श्री सोमनाथ मंदिर परिसरात सोमनाथ स्पोर्ट्स क्लब तर्फे आयुवेदिक रोपांची लागवड करून वनमहोत्सव १३ रोजी साजरा केला त्यावेळी त्या बोलत होत्या .

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीप देशप्रभू , सोमनाथ क्लबचे अध्यक्ष पद्मनाभ आसोलकर , आनंद नाईक , प्रसाद तेली , वन विभाग गार्ड अमित कलंगुटकर ,वनाधिकारी मारियान देसौझा आदी उपस्थित होते .

आरोग्याला पूरक असे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवषी सोमनाथ स्पोर्ट्स क्लब विविध उपक्रम राबवत असतात , यंदा २५० पेक्षा जास्त आयुर्वेदिक रोप लावून वनमहोत्सव साजरा केला . या उपक्रमाबद्दल  परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

सर्वत्र विकासाच्या नावावर वृक्षांची कत्तल करून कोन्क्रीटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे , त्यामुळे शुद्ध हवा मोकळी हवा घेताना श्वास रोखला जावू शकतो ,प्रदूषणामुळे सजीव सजीव वृस्ठी धोक्यात आली आहे , झाडे नाही तर प्राणवायू मिळणार नाही ,त्यामुळे मोठी झाडे लावा प्राणवायू मिळावा हा संदेश महत्वाचा ठरत आहे .

​​मनुष्य जीवन व त्यासाठी लागणाऱ्या सुखसोयी , रोजगाराची साधने यासाठी ठीक ठिकाणी झाडे कापून मोठ मोठे प्रकल्प आणावे लागत आहे ,आणि या प्रकल्पाला अडथळा ठरणारी हजारो मोठी झाडे कापावी लागतात , ती कापल्यानंतर साधन सुविधा निर्माण होते , झाडे लावली तर आपल्याला प्राणवायू मिळेल , पाऊस हवा असल्यास झाडे लावा .झाडे केवळ मनुष्याच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी महत्वाची नसून जशे मनुष्याला या झाडा फळापासून फायदा होईल त्याच पद्धतीने पशु पक्षी जनावरे यानाही प्रतक्ष अप्रतक्ष लाभ होत असतो .

झाडे का लावावीत?
झाडे लावली तर निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखून मनुष्याला सुखी जीवन जगता येईल ,त्यासाठी झाडांची लागवड महत्वाची आहे, प्राणवायू मिळेल , पाऊस पडणार आहे , पक्षांचा किलबिलाट झाडावर वृक्ष्वेलीवर बहरणार आहे .म्हणून झाडे महत्वाची आहेत , झाडे केवळ मनुष्याला फळे देत नाहीत तर जिवन्श्रुस्थिचा आधार ठरत आहे , काही झाडे पक्षी जनावरे यांनाही मोठा आधार देत असतात , झाडाचा उपयोग मनुष्याच्या जन्मा पासून ते मरणापर्यंत असतो .

pernemपावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यातील चाळीसही आमदार ,मंत्री वनखाते व कृषी खाते यांच्या सहकार्याने रोपटी वितरीत करण्याचा किंवा वनमहोत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित करतात . मंत्री आमदाराने दिलेले सरकारी रोपटे किंवा कवाथा दिल्या नंतर तो लावला जातो किंवा नाही याची मात्र विचारपूस होत नाही दरवर्षी वनमहोत्सव साजरा केला जातो , सरकारी झाडे मोफत  मिळतात म्हणून ती कशीही नेली जातात मात्र त्याची निगा राखली जात नाही  ती निगा राखावी असा संदेश क्लबने दिला आहे​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: