गोवा 

धोकादायक म्हाखाजन कोलवाळ पुलाकडे सरकारचे दुर्लक्ष!

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
पत्रादेवी ते धारगळ म्हाखाजन कोलवाळ पूल पर्यंतचा राष्ट्रीय  महामार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत असून , ज्या ठिकाणी काम चालू आहे तिथे कोणत्याच प्रकारचे फलक रात्रीच्या वेळी रेडीयम असलेले दिशाफलक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे . त्याचा एक भाग म्हणून १३ रोजी मालपे रस्त्याचे काम सुरु आहे त्याठिकाणी एका ट्रकला अपघात झाला , त्यातून त्याची बरीच नुकसानी झाली .

या रस्त्याचे काम जी एम आर कंपनीला मिळालेले आहे , स्वाभिमानी पेडणेकरांनी या ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र  झोपेचे  सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली नाही , म्हणून स्वाभिमानी पेडणेकरानी थेट न्यायालयात धाव घेवून या ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदवावी म्हणून याचिका दाखल केली आणि न्यायालयाने दाखल घेवून पेडणे पोलिसाना या ठेकेदाराविरोधात पहिला गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला . मात्र आज पर्यंत ती एफ आय आर नोंद झाली कि नाह्गी या विषयी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.

एम व्ही आर ठेकेदाराची अजून मनमानी चालू आहे , रस्त्याचे काम करत असताना जी काळजी प्रवाशाना , वाहनधारकाना घ्यायची असते त्यासाठी रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याच उपाय योजना आखलेली नाही . त्यामुळे आजही या धोकादायक रस्त्यावर अपघात होतात, सरकारने निदान आता तरी या रस्त्याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी विर्नोडा माजी सरपंच सीताराम परब यांनी केली आहे. सीताराम परब  यांनी माहिती देताना रस्त्याचे काम सुरु आहे ते अत्यंत बेजबाबदारपणे चालू आहे , कोणत्याच ठिकाणी दिशाफालक आणि रात्रीच्यावेळी रेडियम नसल्याने वाहनचालक गोंधळून जातात आणि मग अपघात घडतात .

ठेकेदारावर राज्य सरकारने अंकुश ठेवायला हवा होता मात्र सरकारनेही दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर अपघात घडत असतात .पत्रादेवी ते धारगळ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग ६६ चे रस्ता रुंदीकरण आणि आधुनिक कॉंक्रीट पद्धतीने रस्ता करण्याचा ठेका भाजपा सरकारातील आवडते ठेकेदार मेसर्स एमव्ही.आर कंपनीला दिलेले आहे . संपूर्ण रस्त्याचे काम या ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने सुरु केले , त्याविरोधात पेडणे तालुक्यातील दोन्ही लोकप्रतिनिधी आणि उत्तर गोवा खासदार यांनी ब्र काढला नाही . परिणामी त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्यावर्षी पोरस्कडे येथे रेल्वे पुलाच्या बाजूचा १०० मीटर रस्ता संरक्षण भिंतीसोबत तेरेखोल नदीत कोसळला आणखी ४०० मीटर रस्त्याला धोका निर्माण होता. या कोसळलेल्या रस्त्याची दाखल सरकारने जरी तातडीने घेतली तरी मात्र आजपर्यंत ठेकेदारावर कोणतीच कारवाई केली नाही उलट त्यांचे लाड पुरवण्याचे काम भाजपा सरकारने केले .

मांद्रे येथील युवा वकील प्रसाद शहापूरकर यांनी पेडणे पोलिसाना १२ जुलै रोजी या रस्त्याविषयी तक्रार नोंद करावी म्हणून लेखी तक्रार दिली होती , मात्र पोलिसांनी त्या कंत्राटदारावर आज पर्यंत गुन्हा नोंद केला नव्हता , त्या अनुषगाने पेडणे न्यायालयात प्रसाद शहापूरकर यांनी अर्ज करून या कंत्राटदारच्या विरोधात पेडणे पोलिसांनी गुन्हा नोद करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा त्यासाठी अर्ज केला होता . त्यानुसार २५ रोजी न्यायालयाने मेसर्स एम व्ही. आर ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा पोलिसाना आदेश दिला.

पोरस्कडे रेती उपसाचे परिणाम
राष्ट्रीय महामार्ग ६६ जवळच पोरस्कडे तेरेखोल नदीत मोठ्या प्रमाणात  रेती उपसा चालू केल्यामुळे  तेरेखोल पात्रात जबरदस्त खोली झाली आहे .त्याचा परिणाम पावसाळ्यात १०० मीटर रस्ता संरक्षणभिंतीसहित पाण्यात गेला आणखी ४०० मीटर रस्त्याला धोका निर्माण झाला . ठीक ठिकाणी आजही भगदाडे आणि रस्त्याला तडे गेल्याचे चित्र दिसत आहे . मुळात उगवे गावापासून ते कोनाडी कोरगाव पर्यंत रेती उपसाचे प्रकरण शाशनाने तातडीने थांबवायला पाहिजे . कारण या प्रकारामुळे सातार्डा न्हयबाग रेल्वे पुलाला  धोका निर्माण झाला आहे.

अमई डोंगरावरती वीस मीटर हून जास्त खाली खोलदरीत  रस्ता नवीन काढलेला आहे . याचा परिणाम असा झाला कि कधी नव्हे तो पेडणे रेल्वे बोगदा कोसळला . या खोदकामाचा ना हरकत दाखला नगरनियोजन खात्याकडून दिला होता का , किंवा पर्यावरणाचा दाखला होता का याचाही खुलासा सरकारने करण्याची गरज आहे .

मालपे जंक्शन
मालपे जंक्शनवरती ५ पोट रस्ते अस्तित्वात आहेत आता तिथे भगदाड घालून सर्व्हिस रोड करण्याचे काम सुरु आहे . भविष्यात या ठिकाणी पाणी भरून पेडणे गावाचा संपर्क तुटणार आहे , अशी भीती नागरिकांनी  यांनी व्यक्त केली आहे . सध्या या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात . सध्या हा रस्ता चिखलमय झाला आहे .

नको तिथ उड्डाणपूल
नको त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे . सरकारी कॉलेज विर्नोडा या ठिकाणी गरज नसताना उभारलेला  आहे विध्यार्थ्याना मालपे किंवा विर्नोडा जंक्शनवर उतरून   कॉलेजकडे  जावे लागणार आहे . विर्नोडा जंक्शन पावसाळ्यात जलमय होईल अशी भीती व्यक्त केली आहे .  या संपूर्ण रस्त्याला धोका निर्माण झाला असून सरकारने खुलासा करावा अशी मागणी नागरिक करत आहे

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा धोकादायक स्थितीत बनला आहे ,मालपे येथे रस्त्याचे काम जोरात सुरू आहे मात्र त्या ठिकाणी कंत्राटदाराने दिशा फलक लावले नाही त्यामुळे अपघाताची शक्यता आहे  ,सरकारने दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी माजी सरपंच सीताराम परब यांनी केली आहे .

एक काळ असा होता गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करून शहरातील रस्ते चकाचक केले जायचे  आता स्थिती पेडणे तालुक्याचा विचार केला तर वेगळी आहे ,गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्ते सुधारत आहे मात्र शहरातील रस्ते जास्त करून महामार्ग धोकादायक स्थितीत आहे . पेडणे शहरातील मुख्य रस्ते अरुंद आहे ,सर्वत्र वाहतुकीची कोंडी होते लोकांना मनस्थाप सहन करावा लागतो .
शहरातिल रस्त्यांकडे लक्ष  मारले तर  ते रस्ते धोकादायक आणि गावातील रस्ते सुधारताना दिसत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: