गोवा 

‘…अन्यथा पुकारणार जनआंदोलन’

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर ) :
शापोरा नदीतील जेटी हटवण्याचे केवळ आश्वासन दिले जात आहे पण जेटी अजूनपर्यंत शापोरा नदीतच आहे.येत्या बुधवारपर्यंत शापोरा नदीतून जेटीच्या न हटविल्यास कामुर्ली फेरी धक्क्याजवळ बुधवारी जनआंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शापोरा बचाव आंदोलन समितीने दिला.

शापोरा नदीतील जेटीबाबत कृती ठरविण्यासाठी शिवोलीत सकाळी एक बैठक घेण्यात आली.यावेळी जनआंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.जेटी शापोरा नदीतून हटविण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते.जेटी नदीतुन बाहेर काढायचे सोडून जेटीची शापोरा नदीतच कामुर्ली येथे स्थलांतर करण्यात आले आहे.जेटी शिवोली ,ओशेल ,आगरवाडा चोपडे येथून काढल्याने प्रश्न सुटला असे नव्हे.नदीवर केवळ मच्छिमारांचाच उदार्निरर्वाह  चालतो असे नव्हे तर पारंपरिक पद्धतीने मीठ काढणार्यांनाही नदी महत्वाची आहे.  नदीचा समतोल राखणे  शेतकऱ्यांनाही फायदेशीर आहे.किनारी भागातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने नदी महत्वाची आहे.एखादे देवस्थान नदीबाबत निर्णय घेऊ शकत नाही.शापोरा नदीचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी शापोरा बचाव आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अस्थायी समितीचीहि   निवड करण्यात आली . ओशेल पंचायत उपसरपंच मंगेश चोडणकर व आगरवाडा पंचायतीचे माजी सरपंच   अमोल  राऊत यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. अमित मोरजकर ,निलेश वेर्णेकर,जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर,यदुवीर सीमेपुरूषकर ,प्रेमानंद आरोलकर ,माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, महेश कांबळी ,नितीन आगरवडेकर ,दयानंद मांद्रेकर ,विवेक गावकर ,सावळाराम   बिटये गोवेकर , सुनील परब ,संदेश आगरवडेकर ,कामुर्ली पंच सदस्य शरद गाड, अमृत आगरवडेकर ,प्रसाद शहापूरकर ,संजय कोले ,हेमंत चोपडेकर ,ओशेल पंच सदस्य प्रवीण कोचरेकर ,बलभीम मालवणकर  व आसगाव पंच सदस्य सागर नाईक यांची निवड करण्यात आली.

 

जेटीमुक्त शापोरा नदीचे ध्येय :
या बैठकीनंतर पत्रकारांची बोलताना शरद गाड म्हणाले, शापोरा नदीतील जेटी तीन दिवसात पणजीत स्थलांतरित करणार असल्याचे आमदार नीलकंठ हळर्णकर यांनी सांगितले होते.. तीन दिवसांची मुदत सोमवारी संपत असल्याने शापोरा बचाव समिती सोमवारपर्यंत वाट पाहणार आहे. अन्यथा बुधवारी संध्याकाळी चार वाजता शिवोली ,ओशेल ,कामुर्ली ,मोरजी,आसगाव,रेवोडा,चोपडे ,  आगरवाडा,शापोरा व आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र होत जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला यावेळी देण्यात आला..यापूर्वी जेटी स्थलांतर करण्याचे मागणी केली जात होती पण आता जेटी शापोरा नदीत कुठेही नको अशी समितीची मागणी आहे.जेटीमुक्त शापोरा नदीचे शापोरा बचाव आंदोलन समितीचे ध्येय असल्याचे शरद गाड यांनी स्पष्ट केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: