सातारा 

१५ दिवसांत खचला नवा कोरा रस्ता

सातारा ​(​महेश पवार​)​ :
तालुक्यातील जकातवाडी ते शहापूर ऊफळी मार्गे करंडी गावाला जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला​. ​पंधरा दिवसांपूर्वी यां​चे काम झाले​. या कामांसाठी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला​. ​ पण हा रस्ता पाऊस सुरू होण्यापूर्वी खचला. ​ठिकठिकाणी  रस्ता खचल्याने काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येते, यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी संबंधित ठेकेदार यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका​वे आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली ​आहे. ​

संबंधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असुन संबंधित ठेकेदारावर मेहरबानी का दाखवत आहे​. जर लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई केली नाही​, तर संबंधित अधिकारी यांना काळे फासू अशा इशारा मोहिते यांनी दिला​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: