सातारा 

वनविभागाच्या नाकावर टिच्चून केली वृक्षतोड 

सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील नाकिदा येथे एका खाजगी जागेत परवानगी नसताना देखील सर्वे नंबर २२ब८ अरविंद ठक्कर यांच्या मालकीच्या जागेत ,नाकिदा ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्यात आली आहेत.

tree cutingबफर झोन ग्रीन झोन असताना देखील याकडे वनविभाचे दूर्लक्ष आहे. वनविभागास पर्यावरणप्रेमीनी तक्रार दिली तर हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही म्हणत विषय संपवला. यामुळे वनविभागकडून फक्त सामान्य लोकांवर कारवाई केली जाते.  धनिकांची पाठराखण केली जाते हे मात्र स्पष्ट होते.

आता वनविभागाच्या विरोधात येथील पर्यावरणप्रेमी आक्रमक भूमिका घेणार असून या प्रकरणाची चौकशीची मागणी वनमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ‘राष्ट्रमत’सोबत बोलताना सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: